नळ जोडणीत ठेकेदाराकडून लाभार्थ्यांची फसवणूक; ग्राम पंचायत सदस्य संजय सीडाम यांचा आरोप

नळ जोडणीत ठेकेदाराकडून लाभार्थ्यांची फसवणूक; ग्राम पंचायत सदस्य संजय सीडाम यांचा आरोप

नळ जोडणीत ठेकेदाराकडून लाभार्थ्यांची फसवणूक .. ग्राम पंचायत सदस्य संजय सीडाम यांचा आरोप*
नळ जोडणीत ठेकेदाराकडून लाभार्थ्यांची फसवणूक; ग्राम पंचायत सदस्य संजय सीडाम यांचा आरोप

राजू झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

बल्लारपूर:- राज्य शासनाकडुन जनहितार्थ आलेली नळ जोडणी योजना घराघरात पोहचावी हा शासनाचा उद्देश आहे तरीही कोठारी येथील नळ जोडणी उपक्रमात गावकऱ्यांची पीडवनूक होत असल्याच्या आरोप ग्रा पं सदस्य संजय सिडाम यांनी केला आहे.

जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने महाराष्ट्र राज्य शासनाकडून जनहितार्थ नळ योजना घराघरात पोहचावी या शासनाचा उद्देश होता आणि शाशनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून ही नळ जोडणी योजना राबविण्यात येत आहे. अंदाजे १५ लाख रुपये खर्चून बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठारी ग्रा पं स्तरावर ४९९ नळ जोडणी प्राप्त लाभार्थ्यांना मोफत स्वरूपात देणे आहे. या कामाचे कंत्राट पंदिलवार नामक ठेकेदार यांना दिले आहे व नळ जोडनिचे काम शंभरकर ठेकेदार नामक करीत आहे. वार्ड क्रं १ मध्ये जवळपास शंभरावर पात्र नळ जोडणी पुर्ण झाली आहे. यासाठी सिमेंट रोड फोडण्यासाठी ग्रायडर मसीनचा वापर केला जात आहे. मशीन साठी लागणारी विज सदर ठेकेदार लाभार्थ्यां कडुन घेऊन विजेचा वापर करत आहे .. त्यामुळे नळ जोडणी लाभार्थ्यांना विजेचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ठेकेदाराकडून लाभार्थ्यांची हि पिळवणूक होत आहे. असे असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

कोरोना काळ असल्याने लोकांच्या हाताला काम नाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे अशा परीस्थितीत विज बिलात अतीरीक्त बोजा सहन करावा लागणार आहे तेव्हा ठेकेदाराने स्वतंत्र जनरेटर. ट्रॅक्टर मशीन लाऊन खोदकाम करावे अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य संजय सिडाम यांनी केली आहे.