*एक आदिवासी कुटुंबावरिल केवळ अज्ञानापायी ओढावलेले संकट आणि मग धाऊन आली “राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद”*

मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
ईसा तडवी मो 7666739067
*घटना गोंदेगाव ता.सोयगांव जिल्हा औरंगाबाद ची*
*मा.रणजीत तडवी सर जे “राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद” चे जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे,अन सम्पूर्ण आदिवासी समाज हा रणजीत भाउना “सर्व सामान्यांसाठी धाऊन जाणारा समाजनिष्ठ म्हणून ओळखतो” त्यांचा मा.नंदलाल आगारे सर(सोशल मीडिया जिल्हा प्रभारी) यांना फोन आला,आणि त्यांनी सदर घटनेची माहिती दिली.आणि मग तड़का फड़की सुरु झाला सदर घटनेतील सत्य-असत्याबाबत गाम्भीर्य उहापोह,शाहनिशा-भेट-चर्चा,पडताळनी करण्याचा सत्र.*
*सदर आदिवासी कुटुम्ब आणि संबंधित नातेवाइकांचा शिक्षणाशी कडिमात्रचा संबंध नाही.पुणे जिल्हा दौण्ड येथे उसतोड़ि चे कामगार* *असलेले हे कुटुम्ब पोटात दुखत होते म्हणून दवाखान्यात जाण्यासाठी एम्बुलेंस चा आधार घेतात आणि रस्त्यातच प्रसूतिकळा वाढल्याने प्रवसातच बाई प्रसूत होते आणि एका गोंड़स मुलीला जन्म देते.मग पुढे “ससून “दवाखान्यात दाखल झाल्यावर डॉक्टर बाळाला इमरजेंसी वार्डला भर्ती करून उपचार सुरु करतात.इकडे हे दाम्पत्य दवाखान्याचा खर्च पेलावता येणार नाही,म्हणून काय करावे, समाधान ला सुचेनासे झाले,तो घाबरला.त्यात बाळाची आईची तब्बेत 3/4दिवस भानावर नव्हती.म्हणून शेवटी समाधान ने मागचा पुढचा विचार न करता अज्ञानानाने,घाबरून जाऊन (आपण निर्दईपणाने पण म्हणू शकतो)स्वतःच्या पोटच्या बाळाला तिथेच दवाखान्यात वाऱ्यावर सोडून थेट दौण्ड तदनंतर गोंदेगाव ला सपत्नीक पलायन केले,आज 7/8 महीने निघुन गेले.समाधान ला वाटले की आपले काम फत्ते झाले,किंवा अज्ञानामुळे त्याला त्यांच्या ह्या कृत्याचे पश्चाताप ऐवजी उलट अप्रूफ वाटू लागले,आणि मग नेहमीप्रमाने सदर दाम्पत्य गुण्यागोविंदाने जगु लागले.त्यांच्या संसारात व्यस्त झाले न झाले अचानक घटनेच्या 7/8महिन्यातच मा.रणजीत तडवी(रा.आ.ए.प.जिल्हाध्यक्ष जळगाव) यांचा त्याना फोन गेला. जेणेकरून त्याचं बाळ त्यांना न्यायिक पद्धतीने सुपुर्द करता येईल. _(तत्पुर्वि रणजीत तडवी यांना पुणे पोलीस स्टेशन मधून संबंधित पोलीस कर्मचारीकडून माहिती मिळाली होती.)_ केवळ अज्ञानापायी झालेली चूक आता चव्हटयावर येऊन हॉस्पिटल बिल च्या भीतिने केलेली चूक आता लोकांच्या निदर्शनात येऊ नये म्हणून त्यांना चक्क धक्काच बसला,ते घाबरले अन घाबरून सत्य घटनेची उकल करायला त्यांची हिम्मत होत नव्हती.म्हणून रणजीत भाऊ तडवी स्वतःच्या महत्वपूर्ण कामात औरंगाबाद येथे व्यस्त असल्याने त्यांनी घटनेचा वैधानिक वृत्तांतासाठी आपल्या राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद च्या तसेच इतर संघटनेच्या कार्यकरत्याना त्यांच्या राहत्या घरी गावी गोन्देगाव येथे संबंधित ठिकाणी तड़काफड़की पाचारण केले. चौकशी टीम मध्ये मा.जाकिर तडवी सर(राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे ता.पाचोरा अध्यक्ष),मा.मुबारकशाह फ़क़ीर सर(प्रोटान कार्यकारी जिल्हाध्यक्ष जळगाव),मा.नंदलाल आगारे सर (सोशल मीडिया जिल्हा प्रभारी),मा.दिपक सोनवणे सर(भारतीय विद्यार्थी मोर्चा धरणगांव ता.अध्यक्ष) यांनी तेथे मोठ्या शितापिने हजर होऊन सदर दाम्पत्य तसेच त्यांचे इतर नातेवाइकांशी चर्चा विनिमय करून खरी आणि वास्तविक माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.सुरुवातीला हे दाम्पत्य घाबरून जाऊन खरी माहिती द्यायला मागे पुढे विचार करत होते,जेंव्हा बामसेफ चे पुर्णकालिन प्रचारक मा.नंदलाल आगारे सर यांनी त्यांना आम्ही तुम्हाला तुमचे बाळ तुम्हाला भेटावे यासाठी आम्ही येथे आलेलो आहे सांगून त्यांना विश्वासात घेतल्यावर वरिलप्रमाने घटना समोर आली…त्यांना त्यांचं बाळ न्यायालयीन प्रक्रियेद्वारे सुखरूप सुपुर्द करण्यासाठी,पुढील कार्यवाही मा.रणजीत तडवी यांच्या देखरेखिखाली होत आहे.*