रेल्वेची धडक लागून एकाचा मृत्यू
✍🏿दिपक दपके
माणगाव शहर प्रतिनिधी
मो ,9271723603
सदर मिळालेल्या माहितीनुसार दिनांक
.१२/ जुलै २०२२ रोजी रात्री अंदाजे ०१.०० वाजण्याच्या सुमारास खरवली फाटा समोर ओपन अम्ब्रेला हॉटेलच्या मागे रेल्वे स्टोन क्र २८/३ ते २८/४ चे मध्ये गोवा बाजुकडुन मुंबई बाजुकडे जाणा-या कोणत्यातरी रेल्वेने भिवा उर्फ भिमसेन गोविंद जाधव, वय ४७ वर्ष रा.कळामजे आदीवाडी ता.माणगांव जि. रायगड हे रेल्वे ट्रॅकवर आल्याने त्यांना रेल्वेची ठोकर लागुन अपघात होवुन अपघातात लहान मोठया, गंभीर स्वरुपाच्या दुखापती होवुन मयत झाला या घटनेची खबर श्री. प्रवीण दिनेश सोनुने, वय ३२ वर्षे , व्यवसाय नोकरी, पोशि/ ७२१३ रेल्वे सुरक्षा बल आउट पोस्ट कोलाड मुळ, रा. चांडलो ता. बुलढाणा, सध्या रा. वरसगांव, ता. रोहा, जि.रायगड
यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिले असता पुढील तपास माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी/ प्रवीण पाटील ,सह पोलीस /अस्मिता पाटील पोलीस हवालदार /रावसाहेब कोळेकर माणगाव पोलीस करत आहेत