ओबीसींना आरक्षण : महाराष्ट्राला ‘सर्वोच्च’ दिलासा

ओबीसींना आरक्षण : महाराष्ट्राला ‘सर्वोच्च’ दिलासा

ओबीसींना आरक्षण : महाराष्ट्राला 'सर्वोच्च' दिलासा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀

वाशीम : – महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. सध्या हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सोडवला जातोय. सुरुवातीला महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र, न्यायालयाने आक्षेप घेत निवडणूका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार निवडणूक आयोगाने काही निवडणूका जाहीर केल्या आहेत. मात्र, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत, ‘पुढील काळात नव्या निवडणुका जाहीर न करण्याचे आदेश दिले आहेत’ न्यायालयाच्या या सूचनेमुळे महाराष्ट्राला ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे आयोगाकडून जाहीर झालेल्या 92 नगर परिषदांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासह करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. पावसाळा आणि इतर प्रशासकीय अडचणी सांगत या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वकिलांनी केला. मात्र, निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्याने या निवडणुकात बदल होणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.✍