चंद्रपूर लोकसभा उपचुनाव रद्द करण्याची जनतेची मागणी

रोशन लोणारे 

चंद्रपूर प्रतिनिधी

मो: 9130553551

चंद्रपूर : दि. 13.07.2023 चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्राचे धडाडीचे नेते खासदार मान. बाळुभाऊ धानोरकर यांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. चंद्रपूरच्या काँग्रेसच्या विदर्भाचा एक सिंहाचा वाटा असलेले नेते अचानक जनतेतून सोडून गेल्यामुळे त्यांची जागा लोकसभेत राहावी यासाठी निवडणूक आयोगाने सर्वच तयारी केलेली आहे. प्रशासनानेही आपली जबाबदारी कोटपूर्वक पार पाडलेली आहे. परंतु आमजनतेची अशी मागणी आहे की लोकसभेची व विधानसभेची सार्वमिक निवडणूक ही जवळपास आठ महीने लांबणीवर आहे. अशा प्रसंगी डबल निवडणूक घेणे म्हणजे आम जनतेच्या खिशाल कात्री व सरकारी तिजोरीला आर्थिक भुरदंड पडण्याची दाट शक्यता आहे. सरकारने म्हणजेच निवडणूक आयोगाने यावर अवश्य विचार करावा. व चंद्रपूरच्या प्रशासनाने यावर निती निष्कर्ष काढून जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवावा अशी मागणी आम जनतेची आहे.

महिन्याने निवडणुकीचा निकाल लागेल तर फक्त ६ महिण्यानेच पुढील लोकसभा व विधानसभांचे सार्वत्रिक निवडणुकांचे वारे पसरण्यापूर्वीच जर चंद्रपूर उपचुनावचे रणशिंग फुकले तर पावसाळ्यात निवडणूकीला सामोरे जावे लागेल: पावसाळ्यात उपनिवडणूका आल्या तर शेतकरी, काबाडकष्ट करणारा, पूर्ण विराम घेईल. त्याला पावसाळ्यात निवडणूका नकोत. याचा सारासार विचार निवडणूक आयोगाने व प्रशासनाने करावा व चंद्रपूर लोकसभेची उपचुनाव रद्द करावा अशी आम जनतेची मागणी आहे. यात प्रामुख्याने प्रा. डॉ. जे. टी.लोणारे आर.पी. आय. नेते यांनी एक लेखी पत्रकातून कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here