छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

निवडणूक कर्मचा-यांना माहिती देऊन सहकार्य करावे :जिल्हाधिकारी पवनीत कौर

छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

अमरावती : – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नवीन मतदार नोंदी, स्थानांतरणाबाबत वगळणी आदींबाबत नागरिकांनी कर्मचा-यांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, दि. 9 ऑगस्ट ते दि. 31 ऑक्टोबरदरम्यान दुबार, समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी, पडताळणी, योग्य प्रकारे विभाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येईल.

एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध होईल. दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधी दि.1 ते 30 नोव्हेंबर असेल. विशेष मोहिमांचा कालावधी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मा. मुख्य निवडणुक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दिवसांनुसार असेल. दावे व हरकती दि. 20 डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येतील. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि. 5 जानेवारी, 2022 रोजी करण्यात येईल.

नवतरूणांनी नोंदी कराव्यात

दिनांक 1 जानेवारी, 2022 रोजी ज्यांना वयाची 18 वर्ष पूर्ण होत आहेत, अशा युवक/युवतींनी मतदार म्हणून आपली नोंद मतदार यादीत करून घ्यावी. तसेच पात्र असूनही ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत नाहीत, त्यांनीसुध्दा आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत. तसेच जे मतदार स्थानांतरित झालेले आहेत, त्यांनी तसेच मरण पावलेल्या मतदारांच्या संदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना देऊन आपल्या नावाचे स्थानांतरण किंवा वगळणीकरिता सहकार्य करावे. या कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांकडे आवश्यक नमुन्यात अर्ज दाखल करून नवीन मतदार नोंदणी तसेच मतदार यादी संदर्भात इतर कामे सर्व नागरिकांना करून घेता येतील. तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. सर्व राजकीय पक्षांनी नेमलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना आवश्यक ते सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी , अमरावती यांनी केले आहे.