भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आरोग्य शिबीर व महिला मेळावा संपन्न.
जळगांव प्रतिनिधी: खंडू महाले मो.7796296480
जळगाव शहरमहानगरपालिका, RL हॉस्पिटल व राज प्रा.माध्य. विद्यालय रामेश्वर कॉलनी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने बचत गटातील महिलांसाठी आरोग्य शिबीर व महिला मेळावा संपन्न झाला
दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी वेळ दु. १२ वा. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मनपा जळगाव अंतर्गत शहरातील बचत गटाच्या महिलांसाठी महिला मेळावा व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते सदरच्या शिबिरामध्ये महिलांना मार्गदर्शन मा.सौ. जयश्रीताई महाजन महापौर यांनी केले अध्यक्षीय भाषणात सांगितले कि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महिलांचे योगदान व देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक अशा महिलांनी लढा दिला व स्वातंत्र्य चळवळीत मोलाची भूमिका बजावली आहे असे सांगितले मा. श्री शाम गोसावी अतिरिक्त आयुक्त, चंद्रकांत वानखेडे उपायुक्त चंद्रकांत पाटील मुख्याध्यापक राज शाळा,हे कार्यक्रमाला उपस्थित होते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बाबत मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे RL हॉस्पिटल जळगाव यांच्याकडील डॉ. विशाल चौधरी, डॉ. अदिती पाटील यांनी शिबिरामध्ये महिलांच्या विविध आजाराची माहिती देऊन शुगर तपासणी ,उच्च रक्तदाब तपासणी,ईसीजी तपासणी आजच्या या शिबिरामध्ये तपासण्या होतील असे सांगितले.सदर शिबिरामध्ये कोरोना लसीकरण व आरोग्य तपासणी मध्ये ४०० महिलांनी लाभ घेतला. सदर च्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री पी.डी. नेहेते सर, प्रास्ताविक श्री शालिग्राम लाहासे, यांनी केले व आभार व्यक्त श्री नितीन जोशी समुदाय संघटक यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे यशस्वी रित्या पार पाडण्याचे कार्य राजेश गडकर समुदाय संघटक मनपा, अब्बास तडवी,अमोल भालेराव,राहुल बडगुजर,आशा चौधरी,कविता जाधव,शितल कंखरे, उज्वला लहासे माविम,सविता सोनवणे, सविता जगताप,मनीषा महाजन माधुरी दाभाडे,तेजल पाटील,वैशाली चाटे यांनी परिश्रम घेतले.