गोडाऊन फोडून सोयाबीन चोरणारी टोळी अटकेत

गोडाऊन फोडून सोयाबीन चोरणारी टोळी अटकेत

गोडाऊन फोडून सोयाबीन चोरणारी टोळी अटकेत

वाशीमजिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀

वाशिम : – जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मैराळडोह येथे फाट्याजवळ पुंडलिक घुगे यांच्या गट नं. १४५ मध्ये 24 जुलै ला दिलेल्या फिर्यादीवरून सोयाबीन कट्ट्याची चोरी झाल्याच्या फिर्यादीवरून गुन्ह्यांची नोंद जउळका पोलीस स्टेशन ला करण्यात आली होती. त्यामुळे तपासाची चक्रे फिरवत असताना १२ ऑगष्ट रोजी अतुल राजु मस्के वय २९वर्षे, रोहन गजानन खंडारे वय २३ वर्ष,अमर बबन खंडारे वय २४वर्शे,विकास गणेश कोल्हे वय २१ वर्षे रा.सर्व मैराळडोह ता.मालेगाव जि. वाशीम येथील असून यांना तब्यात घेऊन ११ कट्टे सोयाबीन ३१५००रु., टाटा एस मालवाहू ४५००००रु. असा एकून ४८१५००रु. चा मुद्देमाल जप्त करण्यांत आला असून सदरची कारवाई स्था.गु.शा. वाशीम चे सपोनि प्रमोद इंगळे ,पोहवा किशोर चिंचोळकर,प्रवीण राऊत,पोकॉ संतोष शेनकुडे, चालक पोकॉ संदीप डाखोरे,निलेश मिसाळ यांनी केली असून पुढील तपास ठाणेदार मोरे यांचे मार्गदर्शनाखाली कल्ले करित आहेत.✍