गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनी चे उद्घाटन. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रम

गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनी चे उद्घाटन.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रम

गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनी चे उद्घाटन. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रम

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड —-नागभीड पंचायत समिती विभागाच्या वतीने स्थानिक जनता कन्या विद्यालय नागभीड येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्य ‘गावाचा व देशाचा इतिहास’ या विषयावर पोस्टर,चित्र प्रदर्शनी पंचायत समितिचे गटशिक्षणाधिकारी अरविंद चिलबुले यांच्या मार्गदर्शनात भरविण्यात आली. या मध्ये अनेक शाळेतील विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. सदर प्रदर्शनी मधील पोस्टर, चित्रे यांची पाहणी मान्यवरांनी केली. सदर प्रदर्शनी विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी पुढील दोन दिवस खुली राहणार आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन नागभीड पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे मॅडम यांच्या हस्ते झाले. यावेळी नागभीड पंचायत समिती चे शिक्षणाधिकारी अरविंद चिलबुले,नागभीड च्या केंद्रप्रमुख सौ. मंगला कोतकोंडावार मॅडम, जनता कन्या शाळेच्या प्राचार्य रंजना तरारे, विषयतज्ज्ञ प्रा,राऊत , प्रा,बन्सोड प्रा,मडावी यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनता कन्या शाळेचे प्रा,चुटे प्रा.आशिष राहुड,प्रा, सुमित राजूरकर,सरस्वती ज्ञान मंदिर चे सहा.शिक्षक पराग भानारकर, प्रा,सतीश जीवतोडे ,संत हरदास विद्यालय चे प्रा, सूरज बोरकर यांनी सहकार्य केले.