आई कणकाई सामाजिक संस्थेचा तृतीय वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन माणगांव तालुक्यातील होडगांव कोंड येथे….
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-माणगांव तालुक्यातील होडगांव कोंड येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली सामाजिक संस्था आई कणकाई होडगांव कोंड या संस्थेचा आज तृतीय वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन सोमवार दि.१४ ऑगस्ट २०२३ रोजी होणार असून यया कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष संस्थापक तथा रायगड भूषण पुरस्कृत श्री, सुशील दादा कदम यांच्या मार्गदर्शनखाली करण्यात आला असून त्यानिमित्ताने सत्यनारायण पुजा व विद्यार्थी गुण गौरव सोहळा तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविक भक्तांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हाहन करण्यात आले आहे.
आई कानकाई सामाजिक संस्था होडगांव कोंड ही संस्था अल्पवाधितच सामाजिक क्रीडा शेक्षणिक क्षेत्रात अग्रेसर झाली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सुशील कदम यांनी समाजपयोगी कामे गरजूना मदत अशी अनेक कामे केली आहेत. या तृतीय वर्धापन सोहळ्याची सुरुवात सोमवारी सकाळी ७ वाजता गावदेवी मातेच्या मंदिरात अभिषेक घालून करणार असून कार्यक्रम स्थळी शिव प्रतिमेचे पूजन त्यानंतर सत्यनारायण महापूजा त्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर आई कानकाई सामाजिक संस्थेचा वर्षभरतील कामाचा आढावा दुपारी १० वी १२ वी उत्तीर्ण विदयार्थ्यांचा गुण गौरव सोहळा सायंकाळी उपस्थित मान्यवराचा सत्कार सोहळा व रात्री भजन रायगड भूषण पुरस्कृत भजन सम्राट उदय बुवा शिंदे श्री समर्थ प्रासादिक भजन मंडळ उणेगांव माणगांव याचा होणार आहे. या तृतीय वर्धापन दिनाचे नियोजन आयोजक समस्त होडगांव ग्रामस्थ व आई कणकाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील कदम व त्याचे सहकारी, महिला मंडळ, होडगांव क्रीडा मंडळ यांनी नियोजन केले आहे.