सरदार पटेल महाविद्यालयाद्वारे विसापूर ग्रामपंचायतीत‘ माटी को नमन- वीरो को वंदन’
• ७५ वृक्षांची केली लागवड
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : 12 ऑगस्ट
येथील सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे विसापूर ग्रामपंचायत येथे ‘मेरी माटी मेरा देश’ ‘माटी को नमन- वीरो को वंदन’ अंतर्गत वृक्षारोपण व अमृतवाटिका निर्माण कार्यक्रम पार पडला. दरम्यान या कार्यक्रमात ७५ वृक्ष लागवड करण्यात आली.
आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाबाबत संपुर्ण देशात व राज्यात मेरी माटी मेरा देश (माटी को नमन विरों को वंदन) अभियान ९ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान राबविले जात आहे. त्याच अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारे संचालित सरदार पटेल महाविद्यालयाचे दत्तक गाव विसापूर ग्रामपंचायत येथे करण्यात आले. या कार्यक्रमात सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, विसापूर ग्रामपंचायतचे सरपंच वर्षा कुडमेथे, उपसरपंच अनेकेश्वर मेश्राम, विसापूर ग्रामपंचायतचे सदस्य, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख आणि रसेयोचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वृक्षारोपण कार्यक्रमात ७५ वृक्ष लागवड करण्यात आली.
नागरिकांत. आपल्या मातीविषयी जनजागृती प्रेम व साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मान व्हावा या यामागील उद्देश आहे. प्रत्येक गावातील, शहरातील माती जमा करून तो कलश दिल्ली येथे पाठविला जाणार आहे. दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ अमृत वाटिका तयार करण्यात येणार असून त्यामध्ये देशभरातून आणलेली माती आणि लहान रोपे वापरली जाणार आहे.
त्याच कार्यक्रमांतर्गत सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील क्रीडांगणात शपथ देखील घेतली.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधा पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहर तारकुंडे, सगुणा तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान यांनी या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.