चुंचाळे येथील बालकलाकाराची ॲमेझॉनच्या जाहिरातीसाठी कशी झाली पहा निवड
✒️सुपडू संदानशिव✒️
यावल तालुका प्रतिनिधी
📱9561200938📱
यावल -तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी व सध्या सातारा जिल्हा पोलिस दलात स्थानिक गुन्हे शाखेत हवालदार या पदावर कार्यरत असलेले हसन रुबाब तडवी यांच्या मुलाची जग व देश पातळीवर नावाजलेल्या नामांकित ॲमेझॉन कंपनीच्या जाहिरातीसाठी सातारा शहरातील बालकलाकार अंश हसन तडवी याची निवड करण्यात आली आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी पुणे येथे ॲमेझॉन कंपनीची जाहिरातीसाठी निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये चुंचाळे तालुका यावल येथील रहिवासी व सध्या सातारा शहरातील अंश तडवी याने उत्कृष्ट सादरीकरण केल्याने त्याची ॲमेझॉनच्या सेलिंग साईट वरील ऍडव्हरटायझिंगसाठी निवड करण्यात आली आहे. ॲमेझॉन साईटवर शनिवारी त्याच्या सहभागाचे छायाचित्रांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अंश तडवी हा मॉडलिंग सोबतच उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे. त्याने यापूर्वी सातारा शहरामध्ये झालेल्या अनेक डान्स स्पर्धेत व मॉडलिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. चुंचाळेच्या बालकलाकार ॲमेझॉन वर झळकल्याने त्याच्या या यशाचे चुंचाळेसह सर्वत्र कौतुक होत आहे.