खालापूरमध्ये समुद्राबारवर अश्लील नृत्य प्रकरण; 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खालापूरमध्ये समुद्राबारवर अश्लील नृत्य प्रकरण; 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे लोधिवली येथील समुद्राबार या हॉटेलमध्ये 12 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अश्लील आणि विभत्स नृत्यप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात महिला वेटर, ग्राहक, हॉटेल कर्मचारी आणि मालक अशा एकूण 13 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार बारा महिने पाहटे पर्यत उघडा असतो अशी नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील उत्पादन शुल्क अधिकारी (खोपोली) कोणतीच कारवाही करतांना दिसत नाही. मात्र खालापूर पोलीस ठाण्याकडून झालेल्या कारवाहीचे कौत्तुक केले जात असून.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 00:45 वा.च्या सुमारास आरोपी क्रमांक 13 असलेल्या एका महिलेस समुद्राबारमध्ये संगिताच्या तालावर अश्लील व विभत्स नृत्य करताना आढळून आली. बारमध्ये उपस्थित असलेले ग्राहक मद्यधुंद अवस्थेत सदर महिलेला अश्लील नृत्य करण्यास प्रवृत्त करत होते.

हॉटेलमधील स्टाफ आणि वेटर्सही या नृत्याला प्रोत्साहन देत होते. त्यामुळे बारमध्ये मोठ्या आवाजात आरडाओरड होत सार्वजनिक शांततेचा भंग झाला. याप्रकरणी हॉटेल मालकावर परवाण्याच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

 

खालापूर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 260/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 296, 54, 3(5) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(W)/131 सह 110, 112, 117 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खालापूर पोलीस करत आहेत.