घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रामभरोसे* *आम आदमी पार्टी घुग्घुस*

53

*घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रामभरोसे*

*आम आदमी पार्टी घुग्घुस*

घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रामभरोसे* *आम आदमी पार्टी घुग्घुस*
घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रामभरोसे*
*आम आदमी पार्टी घुग्घुस*

पंकज रामटेके
घुग्घुस शहर प्रतिनिधी

दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी गरोदर माता पल्लवी चूने या महिलेला रात्री सुमारे ११ वाजताच्या दरम्यान पोटामध्ये वेदना होत असताना प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस इथे आणण्यात आले होते आल्या नंतर कोणताही वैद्यकीय अधिकारी इथे उपस्थित नव्हता ही खूप दुर्दैवी बाब आहे असला भोंगळ कारभार डॉ.वाकदकर पूर्व वैद्यकीय अधिकारी यांच्या बदली नंतर लगेच पाहायला मिळत आहे.
इथे असलेले पीआर डॉ. सागर भोयर यांना आम आदमी पार्टी घुग्घुसतर्फे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की त्या रात्रीचा चार्ज एका महिला डॉक्टर कडे होता व ती महिला डॉक्टर त्या रात्रीला अनुपस्थित होती.
या घटनेची दखल घेत आम आदमी पार्टी घुग्घुसतर्फे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाई करून समोर अश्या प्रकारची घटना होऊ नये याची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी केली.

यावेळी घुग्घुस आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सहसचिव विकास खाडे, सागर बिऱ्हाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, अभिषेक तालापेल्ली, संदीप पथाडे, दिनेश पिंपळकर, सोनू शेटियार, प्रशांत सेनानी, रवी शांतलावार, संतोष सलामे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.