अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न*

48

*अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न*

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न*
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न*

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

अलिबाग,जि.रायगड :- रक्षा सामाजिक विकास मंडळ कर्जत व छत्रपती शिवाजी मंडळ, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 4 सप्टेंबर 2021 रोजी कर्जत परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात 40 नागरिकांनी सहभाग घेतला.
संपूर्ण जगभरात निसर्गचक्रामध्ये अनियमितता आढळून येत आहे. कोणत्याही क्षणी ढगफुटी, वादळ, चक्रीवादळ, अतिवृष्टी, दरड कोसळणे अशा नैसर्गिक आपत्ती वारंवार घडत आहेत. मागील महिन्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आपल्याला माहीतच आहे. या आपत्तींमुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विविध ठिकाणी अतोनात मानवी जीवन व वित्तहानी झाली. महाड, चिपळूण मधील घटना आपल्यासमोर आहेतच. परदेशांमध्ये या विषयांबाबत नागरिकांना प्रशिक्षण देण्यावर जास्तीत जास्त भर दिला जातो. भारतातील काही संस्था याबाबतीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करीत असतात. सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तींना कसे तोंड द्यावे व त्या संकटातून सुरक्षित कसे बाहेर पडावे, या संदर्भात प्रशिक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे.
रक्षा संस्थेमार्फत वेळोवेळी विविध शैक्षणिक आस्थापनांमध्ये व सर्वसामान्य नागरिकांसाठी आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात येत असते.
यावेळी देखील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कर्जत मधील व परिसरातील नागरिकांसाठी आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणात कर्जत तालुक्यातील अंबोट, दहिवली गुंडगे, कर्जत, मुद्रे, रामाची वाडी, कडाव, टेंभरे कशेळे, माथेरान तर कर्जत तालुक्याबाहेरील उल्हासनगर, कल्याण येथून 40 नागरिक सहभागी झाले होते.
या प्रशिक्षणादरम्यान मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास, म्हणजेच अतिवृष्टी, चेंगराचेंगरी बॉम्ब स्फोट, आग लागणे, पूर येणे, भूकंप हे संकट येण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी? संकट आल्यावर कोणती काळजी घ्यावी? व आपत्ती येऊन गेल्यानंतर कोणती काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणात श्री.राम यादव व श्री.अमित गुरव यांनी प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. हे प्रशिक्षण विना:शुल्क आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणासाठी छत्रपती शिवाजी मंडळाचे श्री.अशोक शिंदे, श्री.दत्तात्रय म्हसे, श्री.विनायक गुरव,श्री. राजू मोरे, श्री.संतोष गुरव व इतर सदस्य उपस्थित होते याचबरोबर या प्रशिक्षणासाठी श्री.अभिजीत मुधोळकर व कर्जत पोलिस स्टेशन यांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले.
प्रशिक्षणाच्या समारोपाच्या वेळी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक श्री. अमित गुरव यांनी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेऊन आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी प्रयत्न करावेत, तसेच अशा प्रकारचे कोणतेही प्रशिक्षण आयोजित करावयाचे असल्यास, रक्षा सामाजिक विकास मंडळ यांच्याशी 02141-223704/
9421008778 येथे संपर्क करावा,असे आवाहन केले आहे.