मिडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज थेऊरचा श्री चिंतामणीचा महिमा.
 मिडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज थेऊरचा श्री चिंतामणीचा महिमा.

 मिडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज थेऊरचा श्री चिंतामणीचा महिमा.

अष्टविनायक दुसरा गणपतीः थेऊरचा सर्वाची चिंता हरणारा श्री चिंतामणीचा गणपती.

 मिडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज थेऊरचा श्री चिंतामणीचा महिमा.
मिडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज थेऊरचा श्री चिंतामणीचा महिमा.

थेऊर:- महाराष्ट्र राज्यात पवित्र अशा अष्टविनायकातील मानाचा आणि प्रतिष्ठेचा दुसरा गणपती म्हणुन थेऊरच्या श्री चिंतामणी ओळखला जातो. त्याच्या मंगल दर्शनाने सर्व प्राणी मात्रांची चिंता दुर होते. महाराष्ट्राच्या शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर पुणे सोलापूर महामार्गाच्या रस्त्यांवर थेऊर येथे श्री. चिंतामणीचे मंदीर स्थित आहे. भक्ताच्या इच्छा पुर्ण करणा-या या चिंतामणीची महिमा अर्पमपार आहे.

थेऊर गावाची रोचक कथा..!
चिंतामणी गणपतीचे मंदीर असलेल्या या गावाचे नाव थेऊर असण्यामागेही एक मोठी रोचक कथा दडली आहे. ब्रह्मदेवाने चंचल मनाला स्थिरता लाभावी म्हणून विनायकाचं चिंतन केलं ज्यामुळे ब्रह्मदेवाच्या मनाची चंचल वृत्ती नाहीशी झाली. ही सिद्धी ब्रह्मदेवाला ज्या ठिकाणी मिळाली त्याला त्यांनी स्थावर क्षेत्र नाव दिले व तिथे चिंतामणी गणेशाची स्थापना केली. पुढे या ठिकाणाला थेऊर हे नाव प्राप्त झाले. थेऊर हा स्थावरचा अपभ्रंश झाला.

 थेऊरचा श्री चिंतामणीचा
थेऊरचा श्री चिंतामणी

आख्यायिकेनुसार चिंतामणीची कथा.
प्रसिद्ध कपिल मुनींच्याजवळ त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी चिंतामणी नावाचे रत्न होते. गणासूर नावाचा एक राक्षस एकदा त्यांच्या आश्रमात आला असता त्यांनी त्या रत्नांच्या साहाय्याने त्यास पंचपक्वानांचे भोजन दिले. कपिल मुनींचे पाहूनचार पाहून गणासूर स्तंभित झाला आणि त्याच्या मनात इच्छा पूर्तीच्या त्या रत्नाचा मोह निर्माण झाला, त्याने कपिलमुनींकडे त्या रत्नाची मागणी केली. त्यांनी देण्यास नकार देताच त्याने त्यांच्याकडून ते हिसकावून घेतले. कपिलमुनींनी विनायकाची उपासना केली. विनायक प्रसन्न झाले व गणासुराचे येथे कदंब वृक्षाखाली पारिपत्य केले. कपिल मुनींनी परत मिळालेले रत्न विनायकाच्या गळ्यात बांधले. त्यामुळे येथे विनायकास चिंतामणी संबोधले जाऊ लागले.

अहिल्येचे अपहरण केल्यामुळे गौतमाने इंद्राला शाप दिला होता त्यामुळे तो कुरूप झाला होता. गौतमाच्याच आदेशाने इंद्राने गणेशाची आराधना केली व तो शापमुक्त झाला. त्याचे शरीर पूर्वी प्रमाणेच सतेज झाले. इंद्राने ज्या ठिकाणी बसून विनायकाची आराधना केली तिथे त्याने श्रीगणेशाची स्थापना केली व तेथील सरोवरास ‘चिंतामणी’ असे नाव दिले. तेच हे आजचे थेऊर झाले.

 मिडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज थेऊरचा श्री चिंतामणीचा महिमा.
थेऊरचा श्री चिंतामणीचे मंदिर

पूर्वी पुणे नजिकच्या चिंचवड येथील मोरया गोसावी यांनी या ठिकाणी चिंतामणीची उपासना करून सिद्धी प्राप्त केली अशा कथा आहेत. थेऊर येथील मंदिर मात्र मोरया गोसावी यांचा मुलगा चिंतामणी देव यांनी बांधले. या मंदिरातील गणेश मूर्तीला डाव्या बाजूला सोंड आहे. उत्तरमुख मंदिरात पूर्वाभिमुख चिंतामणीची मूर्ती आहे. प्रशस्त मंदिराला मोठा सभामंडप आहे. मंदिराच्या दोन बाजूंनी मुळा मुठा नदीचा वेढा आहे. अशा सुंदर वातावरणात असलेलं हे मंदिर कित्येक वर्षां पासून भक्तांच्या चिंता आणि दुःखाचा संहार करत आहे.

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. येथील विनायकाची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे. तसेच, डोळ्यात माणिकरत्न आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here