घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर वाकदकर यांचा निरोप समारोह संपन्न

62

घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर वाकदकर यांचा निरोप समारोह संपन्न

घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर वाकदकर यांचा निरोप समारोह संपन्न*
घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर वाकदकर यांचा निरोप समारोह संपन्न

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५

घुग्घुस रविवार 12 सप्टेंबर:- रोजी घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर वाकदकर यांचा निरोप समारोहाचा कार्यक्रम संपन्न झाला. नुकतीच त्यांची प्रशासकीय बदली औरंगाबाद येथे झाली आहे त्याअनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांच्या निरोप समारोहाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर वाकदकर यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच आरोग्य सहाय्यक कावळे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना सुद्धा निरोप देण्यात आला.

वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर वाकदकर हे सन 2014 साली घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाले तेव्हा पासून त्यांनी घुग्घुस परिसरात निरंतर सेवा दिली कोरोना महामारीच्या काळात त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले त्यामुळे त्यांनी सामान्य माणसांचा मनात घर केले. तसेच त्यांच्या पत्नी यांनी देखील काही वर्ष घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा दिली.

सन 2014 ते ऑगस्ट 2021 पर्यंत जवळपास सात वर्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर वाकदकर यांनी घुग्घुस परिसरात सेवा दिली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी कांचन, सालेहा सिद्दीकी, प्रिया पोले, प्रतिमा तिवारी, आरोग्य सहाय्यक झाडे, कावळे, रंगारी, थोरात, रुपाली बजयात, शेडमाके, उईके, वाकूळकर, लांडगे, वाहन चालक गंगय्या बुटकूरी, आरोग्य सेवक बेले, जुनारकर, बावणे, मोरे, गणवीर, कानेतकर, पराते, दडमल, रुक्सना, पार्वती, सुनीता, सविता, चंदू, बोढे उपस्थित होते.