अल्पवयीन मुलीशी संमतीने शारिरीक संबंध हा पण बलात्कारच; नागपुर हायकोर्ट
अल्पवयीन मुलीशी संमतीने शारिरीक संबंध हा पण बलात्कारच; नागपुर हायकोर्ट

अल्पवयीन मुलीशी संमतीने शारिरीक संबंध हा पण बलात्कारच; नागपुर हायकोर्ट

अल्पवयीन मुलीशी संमतीने शारिरीक संबंध हा पण बलात्कारच; नागपुर हायकोर्ट
अल्पवयीन मुलीशी संमतीने शारिरीक संबंध हा पण बलात्कारच; नागपुर हायकोर्ट

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर:- आज मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. रोज महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामूळे आज राज्यातील महिला भयाखाली जगत आहे.

अल्पवयीन मुलीना त्याच्याबरोबर होणा-या चांगल्या आणि वाईटाची समज नसते, अल्पवयीन मुलींना विविध प्रलोभने दाखवून वासनेची शिकार बनवणाऱ्या नराधमांना कठोर धडा शिकवणारा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला. अल्पवयीन मुलीसोबत तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवणे हाही बलात्कारच होतो, असे कोर्टाने स्पष्ट करून संबंधित आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निकाल दिला.

आरोपीने बचाव करण्यासाठी पीडित मुलीच्या सहमतीचा मुद्दा मांडला होता. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही, असा दावा आरोपीने केला. कोर्टाने हा मुद्दा फेटाळून लावला. अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधास दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून काहीच महत्त्व नाही, असे निकालात नमूद केले. गजानन देवराव राठोड असे आरोपीचे नाव आहे. तो यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील रहिवासी आहे. 2018 मध्ये विशेष सत्र न्यायालयाने त्याला मुलीवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून कमाल 10 वर्षे सश्रम कारावास व 11 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेवेळी पीडित मुलगी ही केवळ 14 वर्षांची होती. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले होते. आरोपीने 27 जून 2016 रोजी तिला पळवून आत्याच्या घरी नेले. मुलीशी लग्न केल्याचे सांगितले.

त्याच्या आत्याने त्यांना राहण्यासाठी खोली दिली. त्यामुळे आरोपीने दोन दिवस मुलीसोबत शरीरसंबंध ठेवले. तिसऱ्या दिवशी नातेवाईकांनी दोघांनाही नेरमध्ये परत आणले. दरम्यान मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here