मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र, राजूरा विधानसभा क्षेत्रातील प्रकार; सोशल मीडियावर पत्र तुफान व्हायरल

45

मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र

राजूरा विधानसभा क्षेत्रातील प्रकार; सोशल मीडियावर पत्र तुफान व्हायरल

मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र
मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

राजूरा:- मला मुली भाव देत नाहीत. पटत नाहीत. हा माझ्यावर घोर अन्याय आहे. हा अन्याय मला असह्य झाला आहे. तेव्हा आमदार महोदय विधानसभा क्षेत्रातील यूवातीना तुम्ही प्रोत्साहन द्या. अन आम्हचा सारख्या तरूणांना लाईन द्यायला सांगा. अश्या आशयाचे पत्र थेट राजूरा विधानसभा क्षेत्रातील आमदारांना लिहीले. हे पत्र सध्या समाजमाध्यमात भलतेच चर्चिले जात आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक समस्याना समोर जात असताना एक नवीनच पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर पत्र लिहिणारा नेमका कोण आहे? ज्याच्या नावाने अर्जदाराचे नाव टाकण्यात आले तो की दुसऱ्याचे नाव वापरून अर्ज सोशल मीडियावर व्हायरल केला तो नेमका कोण? असा संशोधनाचा विषय बनला.

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर असे पत्र व्हायरल होत आहे की, माननीय आमदार साहेब सम्पूर्ण तालुक्यात भरभरून मुली आहेत. पण मला एकही मुलगी पटत नसून ही चिंतेची बाब आहे. अर्जदार खेड्यागावातून असून राजुरा गडचांदूर रोज जाणे येणे करतो. परंतु त्याला एकही मुलगी पटत नाही असा मजकूर त्याने लिहिला दारू विकणाऱ्याला व काळ्या डोमळ्या पोरांना girlfriend असते.

तर त्यांना बघून अर्जदाराचा जीव जळून राख होतो. तसा अर्जदार भूषण जांबुवंत राठोड यांनी आमदार साहेबाना विनंती केली की, राजुरा विधान सभा क्षेत्रातील मुलींना प्रोस्थाहन देऊन अर्जदाराला भाव देण्यात यावा. तर एकीकडे हा भूषण जांबुवंत राठोड कोण अशी चर्चा असून त्याने गावचे नाव नमूद केले नाही. यावर आमदार साहेब काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.