नगरपंचायत येथील आत्महत्या प्रकरणात चार जणांवर गुन्हे दाखल

52

नगरपंचायत येथील आत्महत्या प्रकरणात चार जणांवर गुन्हे दाखल

नगरपंचायत येथील आत्महत्या प्रकरणात चार जणांवर गुन्हे दाखल
नगरपंचायत येथील आत्महत्या प्रकरणात चार जणांवर गुन्हे दाखल

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
कारंजा (घा.)१२/०९/२१
येथील नगरपंचायतमध्ये काल शनिवार ११ रोजी लिपीक अशोक जसुतकर गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी आज रविवार १२ रोजी आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण आले असून चार कर्मचार्‍यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे पुढे आले. कारंजा पोलिसांनी नगरपंचायतच्या ४ कर्मचार्‍यांच्या विरुद्ध मृतकाची पत्नी सुनंदा जसुतकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील नगरपंचायतमधील लिपीक अशोक जसुतकर याने नगरपंचायतच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत त्यांच्या कार्यालयातील चार कर्मचार्‍यांचे नाव लिहली होती. नगरपंचायतच्या कर वसुलीसाठी त्यांना चारही आरोपी त्रास देत असल्याचे नावे लिहले. यात राजेंद्र घाडगे, देवीदास मानकर, तूषार साबळे, रामचंद्र नरवळे यांच्या नावाचा उल्लेख असल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बबन मोहंदूळे, निखील फुटाणे, मंगेश गंधे, अंकुश रामटेके करीत आहे.