नागपुर पोलीस विभागात खळबळ, पुण्यातून आलेले 12 पोलिसांना कोरोना.
नागपुर पोलीस विभागात खळबळ, पुण्यातून आलेले 12 पोलिसांना कोरोना.

नागपुर पोलीस विभागात खळबळ, पुण्यातून आलेले 12 पोलिसांना कोरोना.

नागपुर पोलीस विभागात खळबळ, पुण्यातून आलेले 12 पोलिसांना कोरोना.
नागपुर पोलीस विभागात खळबळ, पुण्यातून आलेले 12 पोलिसांना कोरोना.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर :- नागपुर पोलीस विभागातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपुर येथील पोलीस विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पुणे येथे 30 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत एक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यात भाग घेण्याकरीता नागपुर पोलीस दलातील 33 पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. त्यापैकी तब्बल 12 पोलिस कर्मचारी कोरोना वायरसने बांधीत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागपूर पोलिस दलात खळबळ निर्माण झाली आहे.

पुण्यात आयोजीत करण्यात आलेल्या शिबिरात राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पोलिस विभागातुन पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. 9 सप्टेंबरला प्रशिक्षण संपल्यानंतर पोलिस कर्मचारी आपआपल्या कर्तव्याच्या ठिकाणी परतले. नागपुरात आल्यानंतर एका पोलिस कर्मचाऱ्याला ताप आला. त्यानंतर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये संबंधित पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली. त्यांच्यासोबत प्रशिक्षणासाठी गेलेल्या आणखी 20 कर्मचाऱ्यांची चाचणी केली असता त्यापैकी 10 जण कोरोना वायरस बाधित आढळून आले आहेत. तसेच उर्वरीत 13 लोकांची कोरोना चाचणी केली असता आणखी एक कर्मचारी कोरोना वायरसने बाधित आढळून आला. सर्वांवर महापालिकेच्या मदतीने उपचार सुरू आहे. शिबिराला गेलेले अनेक कर्मचारी कोरोना वायरसने बाधित आढळून आल्याने पोलिस दल आणि महापालिका प्रशासनाची चिंता वाढळी आहे.

लशीचे डोस पूर्ण झाल्यानंतरही कोरोनाची लागण
फ्रंट लाईन वर्कर म्हणून पोलिसांचे लसीकरण खूप आधीच पूर्ण झाले होते. यापैकी एका कर्मचाऱ्याला फक्त कुठलातरी आजार असल्यामुळे त्यांनी लशीचे डोस घेतले नव्हते. उर्वरीत सर्वांचे लशीचे डोस पूर्ण झाल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शिबिरामध्ये नागपूरसह अनेक जिल्ह्यातील पोलिस सहभागी झाल्यामुळे आता कोरोनाचा स्फोट होणार का? अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here