आदित्य शिक्षण संस्था, बीड NEET (UG)- 2021 आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये संपन्न

50

आदित्य शिक्षण संस्था, बीड NEET (UG)-2021 आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये संपन्न

आदित्य शिक्षण संस्था, बीड NEET (UG)-2021 आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये संपन्न
आदित्य शिक्षण संस्था, बीड NEET (UG)-2021 आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये संपन्न

श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005

बीड  दि. 12:- बीड येथील आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये NEET (UG)-2021(राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-2021) कोविंड 19 च्या सर्व नियमांचे पालन करून संपन्न झाली.

सविस्तर वृत्त असे की NEET (UG) – 2021 परीक्षा दिनांक 12 सप्टेंबर 2021 रोजी भारतात एकाच दिवशी संपन्न झाली बीड येथील आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये या परीक्षेचे केंद्र होते 840 विद्यार्थ्यांनी या केंद्रात covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा दिली या परीक्षेसाठी बीड जिल्ह्यांमधून विद्यार्थी आले होते. महाविद्यालय परिसरामध्ये विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था दाखवण्यासाठी एलईडी स्क्रीन बसविण्यात आली होती. तसेच कोविड 19 सर्व नियमांचे पालन करावयाचे फलक लावण्यात आले होते. महाविद्यालय परिसरात एक मीटर चे अंतर ठेवून एक चौरस फुटाचे अंतर ठेवून 300 बॉक्स पाच लाईन मध्ये तयार करण्यात आले होते. 840 विद्यार्थ्यांसाठी 74 हॉलमध्ये आसनव्यवस्था करण्यात आली होती. तसेच चार हॉल मध्ये आयसोलेटेड आसन व्यवस्था करण्यात आली होती.

परीक्षेचे पूर्ण नियोजन आदित्य शिक्षण संस्थेचे संचालक तथा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आदित्यभैया सारडा यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले. परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना पेन, मास्क, पाणी बॉटल, बिस्किट पुढयाचे आणि हॅन्डग्लोज या कीटचे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने वाटप करण्यात आले.