पिक पाहणी ऍपमध्ये अडकला अनेक शेतकऱ्यांचा पीकपेरा।। शेतकरी काम धंदे सोडून त्या ऍप च्या मागे लागले ।।

54

पिक पाहणी ऍपमध्ये अडकला अनेक शेतकऱ्यांचा पीकपेरा।।

शेतकरी काम धंदे सोडून त्या ऍप च्या मागे लागले ।।

पिक पाहणी ऍपमध्ये अडकला अनेक शेतकऱ्यांचा पीकपेरा।। शेतकरी काम धंदे सोडून त्या ऍप च्या मागे लागले ।।
पिक पाहणी ऍपमध्ये अडकला अनेक शेतकऱ्यांचा पीकपेरा।।
शेतकरी काम धंदे सोडून त्या ऍप च्या मागे लागले ।।

( NT )नितेश पत्रकार
तालुका प्रतिनिधी वणी
मीडिया वार्ता न्यूज
7741915059

वणी . पिल्की वाढोणा,शिंदिवाढोना,बोपापुर,बाळापूर,दरा, या शेतकर्यांकऱ्याचा पीक पाहणी अँपमध्ये अडकला पिकपेरा . शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाईलद्वारे आपल्या शेतात पेरलेल्या पिकाची नोंद पीक पाहणी अँपमध्ये पिकाचा फोटो काढून नोंदनी करण्याबाबत शासनाने सुचना केल्या आहेत .मात्र या अँपमध्ये अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांना पिकाची नोंदणी करणे कठीण झाले आहे.
आपल्या पिकाचा पेरा आपणच भरा, हा शासनाचा उद्देश असला, तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाइल राहतोच असे नाही .ज्या शेतकर्यांकडे मोबाइल नाही ,अशा शेतकऱ्यांची यामुळे अडचण झाली आहे .पिकाची नोंद करण्याची अंतिम तारिख १५ सप्टेंबर आहे .जे शेतकरी पीक पाहणी अँपमध्ये पिकाची नोंद करणार नाही ,त्यांचा सातबारा कोरा राहील ,तसेच कोणताही लाभ मिळणार नाही, अशी भिती व्यक्त केली जात आहे . तसेच काही शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही त्यांनी काय करायचे अशे प्रश्न निर्माण होत आहे. मात्र पिकाची नोंद करीत असताना ऍप काम करीत नसल्याने,काम सोडून प्रत्येक शेतकरी त्या ऍप च्या मागे लाघूण आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तलाठी,कृषी सहायक असताना शेतकऱ्यांच्या मागे हा व्याप लावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे, काय करायचे आता शेतकऱ्यांने हा प्रश्न निर्माण होऊ लागला ,