बीड: पोलीस पतीच्या जाचाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या
बीड: पोलीस पतीच्या जाचाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या

बीड: पोलीस पतीच्या जाचाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या

बीड: पोलीस पतीच्या जाचाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या
बीड: पोलीस पतीच्या जाचाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या

✒श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005

बीड :- बीड जिल्हामधून एक संतापजनक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. बीड जिल्हामध्ये एका पोलीसाच्या गर्भवती पत्नीने आत्महत्या केल्याची घटनेमुळे संपुर्ण बीड जिल्हा हादळला आहे. आत्महत्या केलेल्या सात महिन्याच्या गर्भवती महिलेने तिच्या पोलीस पतीच्या सततच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बीड जिल्ह्यातील या विवाहित महिलेने माहेर असलेल्या केज तालुक्यातील दरडवाडी येथे घडली आहे.

पोलिसांन कडुन प्राप्त माहितीनुसार, 7 महिन्याची गर्भवती असलेली मयत महिलेचे नाव ज्योती गोविंद जाधवर असे आहे. मृत्यूवेळी ज्योतिच्या गर्भात 7 महिन्याचे बाळ होते. त्यामूळे सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोउपनि शंकर वाघमोडे, जमादार जसंवत शेप, पोना रशीद शेख यांनी पंचनामा केला. सोमवारी सकाळी ग्रामीण रुग्णालय नांदुरघाट येथे ज्योतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बीड जिल्हातील केज तालुक्यातील दरडवाडी येथील ज्योतीचा पाच वर्षापूर्वी विवाह सोलापूर जिल्ह्यातील उक्कडगाव येथील गोविंद जाधवर या पोलीस सेवेत नोकरी करणाऱ्या तरुणासोबत झाला होता. लग्नाच्या वेळी ज्योतीचा वडीलानी 15 लाख रुपये हुंडा दिला. मात्र, ट्रॅक्टर घेण्यासाठी आणखी पैसे घेऊन ये, या मागणीसाठी पती गोविंद वारंवार ज्योतीला मारहाण करत होता.

दोन दिवसांपूर्वी ज्योतीला पतीने मारहाण करुन रात्री तीनच्या सुमारास माहेरी दरडवाडी येथे सोडून गोविंद जाधवर हा गावी परत गेला होता. रविवारी मुलाने घरातील वडील भाऊ आई व इतर सदस्य शेतात गेल्याचे औचित्य साधून घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे ज्योती या गर्भवती होत्या. त्यांच्या पोटात सात महिन्याचे बाळ होते.

गेल्या तीन वर्षामध्ये पती, सासू, सासऱ्यासह दिराचा सतत जाच सुरु होता. रात्रीच्या तीन वाजता मुलीच्या पतीने मुलीला माहेरी सोडले. मुलीला सतत मारत होते, घरातील सासू, सासरे, दीर देखील तिचा सतत जाच करत होते, असं मृत महिलेचा भाऊ बबन दराडे याने सांगितले.

मयत ज्योतीचा पती हा उस्मानाबाद पोलीस दलात कार्यरत आहे. कायद्यामध्ये काम करणाऱ्या रक्षकाने पत्नीचा जाच केला. त्यामुळे आत्महत्या केली असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी केज ग्रमीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here