राजवाड्यातील गणपतीला एक वेगळा इतिहास!* *राजवाड्यातील मानाच्या गणपतीला यंदा 60 वर्षे पूर्ण* *रविवारी विसर्जन झाले*
राजवाड्यातील गणपतीला एक वेगळा इतिहास!* *राजवाड्यातील मानाच्या गणपतीला यंदा 60 वर्षे पूर्ण* *रविवारी विसर्जन झाले*

*राजवाड्यातील गणपतीला एक वेगळा इतिहास!*

*राजवाड्यातील मानाच्या गणपतीला यंदा 60 वर्षे पूर्ण*

*रविवारी विसर्जन झाले*

राजवाड्यातील गणपतीला एक वेगळा इतिहास!* *राजवाड्यातील मानाच्या गणपतीला यंदा 60 वर्षे पूर्ण* *रविवारी विसर्जन झाले*
राजवाड्यातील गणपतीला एक वेगळा इतिहास!*
*राजवाड्यातील मानाच्या गणपतीला यंदा 60 वर्षे पूर्ण*
*रविवारी विसर्जन झाले*

अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335/*

*अहेरी:*- राजवाड्यातील मानाच्या गणपतीला एक वेगळा इतिहास लाभले असून यंदा राजवाड्याच्या मानाच्या गणपतीला तब्बल साठ वर्षे पूर्ण झाले होते रविवारी विसर्जन करण्यात आले.

दरवर्षी मोठ्या धाम धुडाक्यात राजवाड्यात गणेशोत्सव साजरा केले जाते. दरवर्षी वेगवेगळ्या रूपातील गणपतीची प्रतिष्ठापना राजवाड्यात केले जाते. विशेष व उल्लेखनीय म्हणजे नवदुर्गोत्सवालाही राजवाड्यात एक वेगळा ऐतिहासिक परंपरा लाभले आहे.
राजवाड्याच्या मानाच्या गणपतीला दर्शनासाठी भक्ती भविकांचीही मोठी गर्दी उसळत असते. स्तुत्य व नावीन्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवून दरवर्षी महाप्रसादाचे आयोजनही केले जात होते. परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आल्याने गणेशोत्सवालाही ब्रेक लागले असून साधेपणाने गणेशोत्सव साजरा केले जात आहे.
यंदाच्या 60 वर्षे पूर्ण झालेल्या राजवाड्यातील तीन दिवसीय गणपतीचे आज रविवार रोजी विसर्जन करण्यात आले असून ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ या गगनभेदी घोषणेने विसर्जन करण्यात आले.
प्रतिष्ठापणाच्या वेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी शांती नांदो अशी मनोकामना करून राज्यातील कोरोनाचे संकट टळून, शेतकऱ्यांच्या जीवनात सुजलाम-सुफलाम यावे असे गणेशजीला साकडेही घातले होते.
विसर्जनाच्या वेळीही माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, पं. स.सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम आदी व राजपरीवारातील अन्य सदस्यांनी भक्ती-भावाने पूजा अर्चा करून राजवाड्यात यंदाचे साठ वर्षे पूर्ण झालेल्या बाप्पाला अखेरचा निरोप दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here