समुद्रपुरात 17 वर्षांपासून एक गाव एक गणपती संकल्पना अमलात आणली.

52

समुद्रपुरात 17 वर्षांपासून एक गाव एक गणपती संकल्पना अमलात आणली.

समुद्रपुरात 17 वर्षांपासून एक गाव एक गणपती संकल्पना अमलात आणली.
समुद्रपुरात 17 वर्षांपासून एक गाव एक गणपती संकल्पना अमलात आणली.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841

वर्धा/समुद्रपूर:- विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन झाले आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनामुळे त्यातच यंदा गणेशोत्सवात शासनाने खूपच निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेक गावांची एक गाव एक गणपती ही संकल्पना रुजविण्याची मानसिकता झाली आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 2004 मध्ये एक गाव एक गणपती हि संकल्पना अमलात आणली होती. त्यावेळी तालुका स्तरावर सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक प्रशासन, पत्रकारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन एक गाव एक गणपतीची संकल्पना मांडण्यात आली. त्यावेळी 1194 पासूनगणेशाची स्थापना करणार्‍या बाल गणेश उत्सव मंडळाचे नाव सुचवले होते. तेव्हा बाल गणेश उत्सव मंडळानी एक गाव एक गणपती हि संकल्पना हाती घेतली व तीच संकल्पना आजही राबवत आहे. विशेष म्हणजे या गणपतीने जिल्हा व तालुकास्तरावर प्रथम क्रमांकही पटकाविला आहे.

राज्य शासनाने 2006 मध्ये बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छ शहर सुंदर शहर असे दोन विषयाची स्पर्धा ठेवण्यात आली होती. यात बाल गणेश उत्सव मंडळ बेटी बचाव बेटी पढाव हा विषय हाती घेतला होता. यात बाल गणेश उत्सव मंडळानी बेटी बचाव बेटी पढाव ह्या विषयावर विविध कार्यक्रम जनजागृती साडी चोळी हा उपक्रम राबवला होता. त्यावेळी बाल गणेश उत्सव मंडळाने जिल्हा व तालुक्यातील प्रथम बक्षीस पटकावले होते. आजही समुद्रपूर तालुक्यातील एक गाव एक गणपती ही संकल्पना बाल गणेश उत्सव मंडळ चालवत आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांनी व तालुक्यातील नागरिकांनी बाल गणेश उत्सव मंडळाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या बाल गणेश उत्सव मंडळाचे हे 27 वे वर्ष आहे आणि हि संकल्पना जो पर्यंत राहिल तो पर्यंत हि संकल्पना सतत चालुच ठेऊ असे बाल गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष सौरभ आत्राम, उपाध्यक्ष अभय झाडे, सचिव वुषभ राजुरकर, सदस्य करण झाडे, आकाश झाडे, वुषभ झाडे, सौरभ मुळे, तनमय झाडे, आकाश ठाकरे, नंदू गिरोले यांनी सांगितले आहे.