स्पीडने कार चालवने जीवावर बितले, नागपुर मध्ये भीषण अपघात, दोन तरुणी ठार.

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर :- नागपुर मधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पार्टी करून परत येताना वेगाने कार चालवत असताना कार दुभाजकावर धडकून त्यानंतर झाडाला धडक देऊन एका घराच्या वॉलकंपाउंडवर धडकली. या भीषण अपघातात कारमधील दोन तरुणीचा मृत्यु झाल्या. त्यांचे दोन मित्र मात्र कारमधील बलूनमुळे बचावले.
नागपुर अमरावती मार्गावरील भरतनगर चाैकाजवळ रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भावना मोहन यादव वय 18 वर्ष, रा.323, सदर आणि राशी दीपक यादव वय 22 वर्ष, रा. धरमपेठ अशी मृत तरुणींची नावे आहेत. चिराग राजेश जैन वय 22 वर्ष, रा. सतरंजीपुरा आणि गिरिश लक्ष्मण रामलखानी वय 21 वर्ष, रा. न्यू वर्धमाननगर नागपुर अशी या अपघातात किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत.
नागपुर येथील मयत भावना यादव व राशी यादव तसेच अपघातातून बचावलेले चिराग व गीरीश हे चाैघेही संपन्न परीवारातील सदस्य होत. ते मित्रांसोबत पार्टीला जाण्याचे कॉमन कल्चर मानत होते. रविवारी रात्री भावना आणि राशीसोबत भावनाचा भाऊ जयकृष्णाही सोबत असल्याने घरची मंडळी बिनधास्त होती. रात्री उशिरा भावना आणि राशीचा जीवघेणा अपघात घडल्याचे कळताच यादव कुटुंबीय इस्पितळात पोहचले. तेथे आधी राशीला आणि नंतर भावनाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश सुरू झाला. भावना आणि राशी महाविद्यालयीन विद्यार्थी होत्या.