झटक्यालाच चोरांचा ”झटका“ चक्क चोराने मारला शेतकऱ्यांचा मशीन वरच डल्ला
गोंडपीपरी तालुक्यातील हिवरा येथील घटना चोरांमुळे बळीराजा हैराण
राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी : – वन्यजीवांपासून शेतमालाचा स्वरक्षणासाठी शेतकऱ्यांनी शेतात झटका मशीन लावली.शेताचा आत शिरणार्या प्राण्यांना ही मशीन जोराचा झटका देत असते.या मशनी चोरण्यांचा सपाटा चोरांनी चालविला आहे.चोरांचा या कृतीमुळे बळीराजाला आर्थिक झटका बसला आहे.
गोंडपिपरी तालुक्याला जंगलाने वेढले आहे.तालुक्यातील बहूतांश शेती जंगलालगत आहे.त्यामुळे वन्यजीवांकडून शेतात हैदोस सूरू आहे.वन्यप्राण्यांना दुर ठेवण्यासाठी शेतकर्यांनी शेतात झटका मशीनी लावल्या.या मशीनी आता चोरीला जात आहेत. हिवरा येथील शेतकरी शंकर येलमुले यांच्या शेतातील ८५०० रुपये किंमतीची झटका मशीन चोरीला गेली.मशीनी चोरीला जाण्याचे प्रकार वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत.