*व्यवसायातून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे व्हावे*
*माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन*
*बोटलाचेरु येथे कुक्कुटपालन केंद्राचे उदघाटन*

*माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन*
*बोटलाचेरु येथे कुक्कुटपालन केंद्राचे उदघाटन*
*/अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335/*
*अहेरी:*- व्यवसाय व रोजगारातून महिला स्वतःच्या पायावर उभे होऊन सक्षम व्हावे असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.
ते रविवार 12 सप्टेंबर रोजी अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू येथे समूह कुक्कुटपालन केंद्राच्या शुभरंभाप्रसंगी उदघाटनीय स्थानावरून बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने किष्टापूर ग्राम पंचायतीचे सरपंच नंदू तेलामी, उपसरपंच पवन आत्राम, रा.काँ.चे महिला तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, लक्ष्मण येरावार, मधुकर सडमेक, ग्रा.पं. सदस्य तोटावार, संगीता सडमेक आदी मान्यवर उपस्थित होते.
उदघाटनीय स्थानावरून पुढे बोलतांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम म्हणाले की, रोजगाराच्या शोधात आपल्या भागातील महिला भगिनी बाहेर स्थलांतर होऊ नये यासाठी आदिवासी भागातील महिलांना स्वतःच्या गावा व घराजवळ रोजगार प्राप्त व्हावे याकरिता महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभाग स्तुत्यप्रिय उपक्रम व पाऊल उचलले असून ही योजना निश्चितच फलदायी ठरेल असा आशावाद व्यक्त करून महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे होऊन महिलांनी स्वतःची उन्नती करावे असे आवाहनही यावेळी भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.
तसेच पुढे, बोटलाचेरू प्रमाणेच अन्य गावातही कुक्कुटपालन योजनेचे कार्य राबविण्यात येणार असल्याचे सांगून महिलांना रोजगार व व्यवसाय मिळावे हाच एकमेव उद्देश असल्याचेही आवर्जून सांगितले.
यावेळी मनीषा सडमेक, उर्मिला सडमेक, मंगला सडमेक, सुरेखा तोरे, जसवंता कुमरे, वनिता मडावी, राधाबाई कोरेत सुरेश सडमेक, पुनजी मडावी, पोट्टी तलांडे, विठ्ठल मडावी आदी व ग्रामस्थ उपस्थित होते.