बलात्कार प्रकरणी पीडितेला मदत करणाऱ्या पैलवानाची गोळी झाडून हत्या नागपूरमधील या घटनेने एकच खळबळ उडालीय

बलात्कार प्रकरणी पीडितेला मदत करणाऱ्या पैलवानाची गोळी झाडून हत्या

नागपूरमधील या घटनेने एकच खळबळ उडालीय. 

बलात्कार प्रकरणी पीडितेला मदत करणाऱ्या पैलवानाची गोळी झाडून हत्या
नागपूरमधील या घटनेने एकच खळबळ उडालीय

✍️त्रिशा राऊत ✍️ नागपूर ग्रामीण प्रतिनिधीं 

मो 9096817953

 

नागपूर. नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. बलात्कार प्रकरणी पीडितेला मदत करणाऱ्या पैलवानाची गोळी झाडून हत्या करण्यात आलीय. ही हत्या आरोपीच्या भावाकडून करण्यात आली आहे.नागपूरमधील या घटनेने एकच खळबळ उडालीय. केशव मस्के ( वय, 52 ) असे हत्या झालेल्या पैलवानाचे नाव आहे. तर भरत कळंबे ( वय, 30 ) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

तीन वर्षांपूर्वी आरोपी प्रेमराज कळंबे याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या प्रकरणात मस्के हे पीडिता आणि तिच्या आईला न्यायालयीन प्रक्रियेसाठी मदत करत होते. परंतु, भावा विरोधातील बलात्काराच्या प्रकरणात बलात्कार पीडीतेचे कुटुंब आणि इतर साक्षीदारांना न्यायालयीन कामकाजात मदत करतो, या रागातून बलात्कार प्रकरणातील आरोपीचा सख्खा भाऊ भरत कळंबे याने बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या केशव मस्के यांची हत्या केली. काल रात्री नागपूरमधील नरखेड पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या बेलोना गावात ही धक्कादायक घटना घडलीय. पोलिसांनी या प्रकरणी गोळी झाडून केशव मस्के यांची हत्या करणाऱ्या भरत कळंबे या संशयीत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री केशव हे दूध वाटून परत आपल्या घराकडे जात असताना भरत याने त्यांच्यावर गोळी झाडली. यात केशव यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपीचा भाऊ बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात असून हत्या झालेले केशव मस्के हे या प्रकरणात बलात्कार पीडित आणि तिच्या आईला मदत करत होते. तोच राग भरत याच्या मनात होता. त्यातूनच भरत कळंबे याने केशव यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली. केशव हे कुस्तीचे जिल्हा स्तरावरील चॅम्पियन होते.

दरम्यान, हत्येच्या या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून गावकरी नरखेड पोलीस स्टेशनसमोर गोळा झाले आहेत. पोलिसांनी नरखेड पोलीस स्टेशनच्या समोर आणि गावात बंदोबस्त वाढवला आहे. या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी गावकऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here