महिला सरपंचाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर करवाई करा.

महिला सरपंचाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर करवाई करा.

महिला सरपंचाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर करवाई करा.

✍️मनोज एल खोब्रागडे✍️

सह संपादक मीडिया वार्ता न्यूज

मोबाईल नंबर- 9860020016

 

चिखली : – सरपंच संघटनेची जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी

चिखली तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षा वर्षाताई परमेश्वर पवार यांनी जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन सादर केले निवेदनात नमूद केल्या प्रमाणे

शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये ५०% जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ५०% पेक्षा अधिक गावांमध्ये सरपंच पदावर महिला सरपंच आहेत. मेरा बु हे दहा हजार लोकसंख्येचे गाव असून 11 फेब्रुवारी 2021 रोजी सरपंच पदाची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये सौ अनीताताई लक्ष्मण वायाळ ह्या लोकशाही मार्गाने निवडणुकीमध्ये विजयी झाल्या. त्या काळामध्ये गावामध्ये भीषण पाणी टंचाई होती. परंतु आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवून योग्य नियोजन करत. पाणी टंचाई वर मात केली. गावामध्ये विकासाच्या विविध योजना आणल्या. त्या दिवशी सुद्धा सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या सांडपाण्याचे नियोजन आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन करत असताना तिथे गावातील सुनिल माधवराव पड घा न व अनंथा शामराव पडघान हे दोघे जण आले व अश्लिल भाषेत शिवीगाळ केली व महिला सरपंचाला मारहाण करून. विनयभंग केला. ह्या घटनेची पोलिस तक्रार केली असता या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला परंतु त्याच दिवशी रात्री एक एक मन घडण कहाणी रचून सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. सरपंच हा गावाचा घटनात्मक प्रमुख असतो. त्यात महिलांचा आदर करणे हि आपली संस्कृती आहे. आणि अशा घटना घडणे अत्यंत लज्जास्पद आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आहे. हा एका व्यक्तीचा नसून लोकशाही चा आपमान आहे. त्यामुळे असे विघातक कृत्य करणाऱ्यांवर कठोर करवाई व्हावी तसेच सरपंच महिला ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित व्यक्तींवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे खारीज करण्यात यावे.

सरपंच हे पद लोकसेवकाच्या व्याख्येमध्ये समाविष्ट करण्यात यावे. आणि महिला सरपंचांना मासिक सभा ग्रामसभा व इतर सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सुध्दा निवेदनामध्ये करण्यात आली आहे. निवेदनावर आमडापुर, मंगरूळ नवघरे, तेल्हारा, सोनेवडी, मलगणी, केलवद, पळसखेड, भानखेड, गोद्री, आसोला, शेळगाव अटोळ, रोहडा, मिसालवडी, देऊळगाव घुबे, मलगी, मुरादपुर, कोलारा, भरोसा, मनुबाई, गुंजाळा, पाटोदा, चाळीस सरपंचांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here