जुण्या वैमनस्यातून वृद्ध दाम्पत्याला मारहाण

54

जुण्या वैमनस्यातून वृद्ध दाम्पत्याला मारहाण

जुण्या वैमनस्यातून वृद्ध दाम्पत्याला मारहाण

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय उत्तम पडघान✍️

🪀8554920002🪀

 

मालेगांव -तालुक्यातील भौरद येथे जुन्या वैमनस्यातून वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घटली होती, मारहाणीत जखमी वृद्ध दाम्पत्याला उपचारासाठी वाशिमच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या जबानी वरून मालेगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेमध्ये यशोदाबाई मुकिंदा जटाळे वय 65 वर्षे राहणार भौरद यांनी गजानन समाधान जटाळे व रमेश समाधान जटाळे दोघेही राहणार भौरद यांच्याविरोधात 12 सप्टेंबर च्या रात्री 11.30 वाजता दिलेल्या फिर्यादीवरून 9 सप्टेंबर च्या सायंकाळी 5 वाजता जेव्हा फिर्यादी आपल्या मुलींबरोबर घरी होती तेव्हा गजानन जटाळे दारू पिऊन घरासमोर शिवीगाळ करू लागला, शिवीगाळ का करतो असे विचारले असता गजानन ने फिर्यादीला उद्देशून म्हातारे तु आणि तुझ्या नवऱ्याने माझ्याशी संबंध तोडून मला बदनाम केले आहे. असे म्हणून थापड बुक्क्यांनी फिर्यादी व तिच्या मुलीला मारहाण केली आरोपीचा भाऊ रमेश जटाळे याने शिवीगाळ केली. गजानन जटाळे ने काठीने फिर्यादिच्या डाव्या मनगटावर मारून जख्मी केले, फिर्यादी चे पति मध्ये आले असता रमेश जटाळे ने कॉलर धरून खाली पाडले व दोघांनी मिळून काठीने व थापड बुक्क्यांनी मांडीवर डोक्यावर पाठीवर व चेहऱ्यावर मारून जख्मी केले मारहाणीत फिर्यादी च्या पतिचे दात पडले दोघांनी जिवे मारण्याची धमकी दिली अशा फिर्यादीवरून मालेगांव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा क्रमांक 364 / 2022 नोंदवून भादंवि च्या 326, 324, 323, 504, 506, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन पांचाळ करीत आहेत.