सख्खा पोटच्या पोरीचा तीन लाख रुपये सौदा करुन‌ विक्री करणाऱ्या निर्दयी बाप व सावत्र आई यांच्या विरुद्ध पीडित मुलीची पोलिसात तक्रार चाळीसगांवच्या भोंदु बाबाकडून सुद्धा होत होता अघोरी विद्येचा प्रयोग पाचोरा तालुक्यातील कोल्हे गावातील अल्पवयीन पिडीत मुलीने फोडले बिंग

54

सख्खा पोटच्या पोरीचा तीन लाख रुपये सौदा करुन‌ विक्री करणाऱ्या निर्दयी बाप व सावत्र आई यांच्या विरुद्ध पीडित मुलीची पोलिसात तक्रार

चाळीसगांवच्या भोंदु बाबाकडून सुद्धा होत होता अघोरी विद्येचा प्रयोग

पाचोरा तालुक्यातील कोल्हे गावातील अल्पवयीन पिडीत मुलीने फोडले बिंग

सख्खा पोटच्या पोरीचा तीन लाख रुपये सौदा करुन‌ विक्री करणाऱ्या निर्दयी बाप व सावत्र आई यांच्या विरुद्ध पीडित मुलीची पोलिसात तक्रार चाळीसगांवच्या भोंदु बाबाकडून सुद्धा होत होता अघोरी विद्येचा प्रयोग पाचोरा तालुक्यातील कोल्हे गावातील अल्पवयीन पिडीत मुलीने फोडले बिंग

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर- 9860020016

पाचोरा : – जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील कोल्हे या गावातील नितीन यशवंत वाघ या नामक व्यक्तीने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीचा तीन‌ लाख रुपायात भडगांव येथील एका इसमासोबत दिनांक: २३/११/२०२१ सौदा करुन त्या अल्पवयीन मुलीची विक्री केल्याची विदारक घटना घडली असून सदर घटनेचे बिंग खुद ती अन्यायग्रस्त अल्पवयीन पिडित मुलगी उर्मिला नितीन वाघ हिने फोडून त्या निर्दयी बापाविरुद्ध व निर्दयी सावत्र आई विरुद्ध व भडगांव येथील लोकांविरुद्ध हरेश्वर पिंपळगाव पोलीस स्टेशनला तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.

सविस्तर माहिती अशी की,पाचोरा तालुक्यातील कोल्हे या छोट्याशा गावात नितीन यशवंत वाघ नामक व्यक्ती आपली मोलमजुरी करुन पोट भरतो त्याला दोन पत्नी असून‌ पहिली पत्नी ही मयत झालेली आहे पहिल्या पत्नीला तीन मुले असतांना त्यांनी सख्खा साली बरोबर पुन्हा पुनर्विवाह केला त्या पुनर्विवाह केलेल्या पत्नीला सुद्धा दोन मुले झाली नितीन हा तसा रागीट स्वभावाचा असल्याने जे मनात येईल तसा तो वागतो. घरात पहिल्या व दुस-या पत्नीचे मुले असल्याने नेहमीच दुस-या पत्नीचे आणि त्यांचे खटके उडत होते हा दोन्ही पती पत्नीचा वाद मुले घरात बघत होते.नेमका हा वाद कशावरुन होतो हे मात्र मुलांना कळत नव्हते
अशातच मागील वर्षी दोघे पती पत्नी घरात हळूहळू चर्चा करत होते तेव्हा पहिल्या पत्नीची मुलगी जिचे नाव उर्मिला आहे तिला विकून टाकायचे असा निर्णय झाला तेव्हा त्या पती पत्नीचा पुर्ण संवाद मोठी मुलगी जिचे वय १६ वर्षे असू ती म्हणजे उर्मिला हिने ऐकले तेव्हा तिला कळाले की,माझा बाप व सावत्र आई हे मला विकायला निघाले तेव्हा तिला धक्काच बसला पण नाईलाज होता.

जळगाव जिल्ह्यातील भडगांव येथील प्रितम सोनवणे या नामक इसमा सोबत त्याचा तीन लाख रुपयात आपल्या पोटच्या मुलीचा सौदा करुन तिची विक्री करुन समाधान संतोष सोनवणे या नामक इसमासोबत तिचा खोट्या नाट्या लग्नपत्रिका छापून लग्न केल्याचा बनाव केला असल्याचे पिडित मुलगी उर्मिला नितीन वाघ हिने पोलीसांना दिलेल्या तक्रार अर्जात नमुद केले आहे.

ती अन्याय पिढीत मुलगी पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हणते की, माझा निर्दयी बापाने व निर्दयी सावत्र आईने माझ्या अल्पवयाचा फायदा घेऊन व वय कमी असतांना सुद्धा माझे जबरदस्ती भडगांव येथील समाधान संतोष सोनवणे या इसमासोबत लग्न लावून दिले त्या बदल्यात त्यांनी तीन लाख रुपये घेतले असल्याचे ती पिडित मुलगी म्हणते.

तिने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हणते की,साहेब तो निर्दयी असलेला बाप, तो तो बाप नसून कसाई आहे नितीन वाघ व निर्दयी सावत्र आई दिपाली नितिन वाघ या दोंघावर व भडगांव येथील समाधान संतोष सोनवणे या नराधमासह त्या क्रुर लोकांवर व माझ्या निर्दयी बाप व सावत्र आई यांना साथ देणा-या लोकावर तात्काळ कारवाई करुन मला न्याय द्यावा अशी तक्रार करुन पोलीसांना विनवणी केली आहे.

या संदर्भात आपले ज्ञानपंख थेट कोल्हे गावात जाऊन अन्यायग्रस्त पिडित मुलीची भेट घेऊन खरी वस्तुस्थिती जाणून घेतली असता त्या मुलीने तिच्या आयुष्यात घडलेल्या भयावय प्रकाराबाबत करुणकहाणी सांगितली त्यावेळेस तिची वडीलाची आई, सख्खी आत्या व आत्याचे पती हे हजर होते
तिला आमच्या ज्ञानपंख वृत्तपत्राच्या टिमने धिर देऊन अन्यायाविरुद्ध आपले ज्ञानपंख तुझ्या पाठीशी सक्षमपणे उभा आहे.

या अन्याय पिढीत मुलीने,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, पोलीस अधीक्षक जळगांव यांना सुध्दा तक्रार केली आहे.
या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी लगेच दखल घेऊन सदरील त्या अन्याय पिढीत मुलीच्या निर्दयी बाप व सावत्र आई विरुद्ध व भडगांव येथील लोकांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात येईल असे दुरध्वनी द्वारे सांगितलं.
या पिडित मुलीच्या तक्रारीने पाचोरा तालुक्यात खळबळ माजली आहे.