माणगांव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी रिक्षा चोरी करून आणणाऱ्या टोळीचा पर्धापाश

माणगांव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी रिक्षा चोरी करून आणणाऱ्या टोळीचा पर्धापाश

माणगांव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी रिक्षा चोरी करून आणणाऱ्या टोळीचा पर्धापाश

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :- रिक्षा चोरी करून फसवणूक करणाऱ्या टोळी ला माणगांव पोलिसांनी केली जेलबंद मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की माणगांव येथील प्रदीप प्रवीण मोने वय वर्ष 36 व्यवसाय किराणा मालाचा दुकान रा. उतेखोल माणगांव यांनी अमित सुरेश बुटे रा उतेखोल वाडी माणगांव याच्याकडून जुनी रिक्षा घेतली होती सदर रिक्षा बाबत प्रवीण मोने यांनी अमित बुटे याच्या जवळ रिक्षाचं नंबर व कागद पत्राची विचारणा केली असता त्यांनी रिक्षाची कागद पत्रे दिली नाहीत तसेच संपर्क करण्यास टाळाटाळ करू लागला म्हणून प्रवीण मोने रा उतेखोल माणगांव यांनी माणगांव पोलीस स्टेशनं येथे तक्रार केली यावेळी माणगांव पोलीस स्टेशनं चे ठाणे अंमलदार कोळेकर यांनी गुन्हा रजि नं 257/2022 भा. द. वि. क 406,420 अन्वये गुन्हा दाखल केला.

सदर गुन्ह्याचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील याच्या मार्गदर्शनखाली सुरु केल्या नंतर आरोपी नामे अमित सुरेश बुटे, वय 36 रा उतेखोलवाडी माणगांव यास अटक केल्या नंतर त्यांनी त्याचे साथीदार नामे योगेश पाटु कोरगावकर (लारा ) वय 39 वर्ष, रा. घर नं 164 रमाकात म्हात्रे उफ महापौर याच्या बगळ्याजवळ गोटवली रबाळे नवी मुबंई, केतन राजू जाधव वय 23 वर्ष रा साठे नगर नवशील नाका रबाळे पोलीस स्टेशनं शेजारी नवी मुबंई मुळ रा. रूम नं 590 जाधव चाल साईनाथ वाडी सेक्टर नं.1 ऐरोली नवी मुबंई, आतिष दिलीप पाटील वय वर्ष 26 व्यवसाय कामगार रा.204 हरी नारायण अपार्मेंट गवळी हॉस्पिटल जवळ रबाळे गांव नवी मुबंई याच्या मदतीने केल्याचे सांगितले सदर तपासामध्ये आता पर्यंत एकूण 12 ऑटो रिक्षा एकूण किंमत 4,34000 हजार रुपये मुलं किंमत 12 लाख रुपये एवढ्या किमतीच्या गाड्या जप्त केल्या आहेत.

सदर रिक्षा चोरी झाल्या बाबत रबाळे नवी मुबंई येथे गुन्हे दाखल आहेत. रबाळे पो. स्टे. गु. र नं 409/2022,426/2022,372/2022,219/2022,446/2022भा. द. वि कलम 379 सदरची कामगिरी माणगांव पोलीस अधीक्षक अशोक दुबे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, याचे मार्गदर्शनखाली स पो नि सतीश आस्वर, पो हवा रावसाहेब कोळेकर, पो. ना अल्पेश पवार, पो शी अनिल रिटे, पो शी अमोल पोदे, नाथा दहिफळे, पो शी संजय सुरवसे, पो शी निखिल सुर्ते, यांनी अधिक तपास करून चोरी करणाऱ्या टोळी चा पर्धापाश केला आहे.तसेच पुढील तपास माणगांव पोलीस हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here