भा.मा.कन्या शाळा रिसोड ची विद्यार्थिनीं एन एम एम एस परीक्षेत जिल्ह्यातून मेरिट मध्ये
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀8554920002🪀
रिसोड ■ स्थानिक भारत माध्यमिक कन्या शाळेतील विद्यार्थिनीं कू. समृद्धी नितीन महाकाळ ही एन एम एम एस परीक्षा २०२१ २२ मध्ये वाशिम जिल्ह्यातून ओबीसी प्रवर्गात १७ वी मेरिट आली आणि शाळेचा नावलौकिक वाढविला आहे त्याबददल तिचे जिल्हाभरात कौतुक केले जात आहे.
सदर परीक्षा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजने अंतर्गत घेण्यात येते या परीक्षेसाठी कु. समृद्धी नितीन महाकाळ ही विद्यार्थिनीं मेरिट मध्ये येऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे.
या गुणवंत विद्यार्थिनीला शाळेच्या प्राचार्या सौ मंजुषा देशमुख वानरे, राजगुरू 3 जाधव भावसार यांनी मार्गदर्शन केले. तर या मेरिट प्राप्त विद्यार्थिनींचे दी आला.
आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार अनंतराव देशमुख, विश्वस्त सौ जयश्रीताई देशमुख व सचिव अॅड. नकुल देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सौ अमृताताई यांच्या शुभ हस्ते चांदीचे मेडल प्रदान करून सत्कार करण्यात होती.
त्याच प्रमाणे या गुणवंत विद्यार्थिनींचे शाळेचे सर्व शिक्षक, शिकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.✍