लोंढोली सर्कलमध्ये पोषण महाअभियान "सावली तालुक्यातील १७०अंगणवाडीतील बालकांची कुपोषण मुक्तीकडे वाटचाल"

लोंढोली सर्कलमध्ये पोषण महाअभियान

 “सावली तालुक्यातील १७० अंगणवाडीतील बालकांची कुपोषण मुक्तीकडे वाटचाल”

 

लोंढोली सर्कलमध्ये पोषण महाअभियान
“सावली तालुक्यातील
१७०अंगणवाडीतील बालकांची कुपोषण मुक्तीकडे वाटचाल”

बाबा मेश्राम

सावली तालुका प्रतिनिधी

7263907273

 

  सावली: कुपोषणाचे प्रमाण कमी करणे , मुलींच्या जन्माचे स्वागत करणे , अंगणवाडीच्या माध्यमातून समाजात आहार , आरोग्य व स्वच्छता हा संदेश घरोघरी पोहोचविण्याच्या उद्देशाने शासन पोषण महाअभियान राबवित आहे . . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सावली अंतर्गत लोंढोली सर्कलमधील अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण महाअभियानाची सुरुवात करण्यात आली आहे . साखरी येथील अंगणवाडी केंद्रात या उपक्रमाचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य गणपत कोठारे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार चांदेकर, साखरी चे उपसरपंच दादाजी कीनेकर उपस्थित होते यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका पद्मा मोहूर्ले यांनी महिला व बालकल्याण मंत्रालायमार्फत १ ते ३० सप्टेंबर हा महिला पोषण महाअभियान म्हणून शासन राबवत असून यात महिला व त्यांचे आरोग्य ,कुपोषण ,शिक्षण तसेच गरोदर स्तनदा माता आणि मुले यानी आपल्या आरोगयाची काळजी कशाप्रकारे घ्यावी आणि आहार ,स्वच्छता ,लसीकरण यामुळे आपले आरोग्य कसे चांगले ठेवता येईल यावर मार्गदर्शन केले 

 यावेळी आहार प्रदर्शनात गरोदर मातेला आपली व होणाऱ्या बाळाची काळजी कशी घ्यावी याचे आहार प्रात्यक्षिक करून दाखविन्यात आले.

कार्यक्रमात मार्गदर्शन व प्रात्यक्षिक पर्यवेक्षिका पद्मा मोहूर्ले यांनी केले .कार्यक्रमाचे संचालन नीलिमा भुरसे तर आभार वैशाली उराडे यांनी मानले.

सावली प्रकल्प अंतर्गत१७०अंगणवाडी केंद्रात पोषण महाभियान राबविण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्याने कुपोशनाचे प्रमाण कमी होण्यावर भर दिला जात आहे तसेच आरोग्य ,स्वच्छता व लसीकरण बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे 

  प्रमोद जोनमवार,बाल विकास प्रकल्प अधिकारी ,पं.स.सावली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here