काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला जळगावमध्ये सुरुवात, मात्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी…

49

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला जळगावमध्ये सुरुवात, मात्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी…

congress-jansawand-yatra

मन्सूर तडवी

चोपडा तालुका प्रतिनिधी

 जळगाव जिल्ह्यात सुरु असलेली जन संवाद यात्रेला. युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करतांना दिसत आहे कारण की नुकतेच यावल तालुक्यात निघालेली जन संवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला असुन . तिथे युवक काँग्रेसचे पदधिकारी नाराज आहे तसेच यावल येथे जन संवाद यात्रेचे जागो जागी बॅनर लागलेले आहे परंतु बॅनर मध्ये सर्व काँगेस सेल चे जिल्हा अध्यक्षाचे फोटो होणे गरजेचे आहे पण त्या मधे युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष यांचे फोटो बॅनर वर नसल्याने युवक काँग्रेसचे पदधिकारी व युवक जिल्हा अध्यक्ष सुध्दा नाराज असल्याचे दिसत आहे 

युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिली आहे की,कांग्रेसची जनसंवाद यात्रा ही संपूर्ण देशात सुरु आहे तसेच जळगाव जिल्ह्यात आता प्रत्येक तालुक्यात राबविली जात आहे पण फादर बॉडी ही युवक काँग्रेसला सोडून काम करीत आहे . प्रत्येक बॅनर वर सर्व सेल चे जिल्हा अध्यक्षांचे फोटो होणे गरजेचे आहे . या मुळे माझी सुध्दा नाराजी आहे . कारण काँग्रेस ने सर्व छोटे मोठे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालावे अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष देवेद्र मराठे यांनी दिली आहे.