राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खरे शिक्षक – डॉ. पंढरीनाथ पाटील. जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा येथे ग्रामगिता व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प संपन्न
देवेंद्र भगत
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
मो: 827534892
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खरे जीवन शिक्षक आहे. त्यांनी देशभ्रमण करुन असंख्य प्रचारक निर्माण केले. संतांनी सांगितलेल्या जीवन शिक्षण पद्धतीने आमचे जीवन बदलणार असून प्रत्येक विद्याथ्र्यांनी जीवन जगण्यासाठी कला शिकली पाहिजे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे. विद्याथ्र्यांनी बलवान व्हावे. जीवन जगण्यासाठी ग्रामगीतेतील अध्याय 19 नुसार राष्ट्रसंतांनी सांगितलेली शिक्षणपद्धती उत्तम असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खरे जीवन शिक्षक असल्याचे प्रतिपादन गंगामाई महाविद्यालय, नगांव, जि. धुळे येथील प्रा.डॉ. पंढरीनाथ पाटील यांनी केले. विद्यापीठाच्यावतीने प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम जन्मशताब्दी केंद्रीय समिती, अमरावती यांचेकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम स्मृति ग्रामगिता व्याखानमालेंतर्गत प्रथम पुष्प जिजामाता महाविद्यालय, जि. बुलढाणा येथे संपन्न झाले,
त्याप्रसंगी ‘जीवन शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर मांडणी करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आचार्य हरीभाऊ वेरूळकर, वनराईचे अध्यक्ष श्री मधुुभाऊ घारड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे, व्यवस्थापन सदस्य अॅड. बाबासाहेब भोंडे, श्री बी.डी. काळे व जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर आदी उपस्थित होते.
व्याख्यान विषयाची मांडणी करतांना डॉ. पंढरीनाथ पाटील पुढे म्हणाले, नवीन शिक्षणपद्धती देशात लागू झाली आहे, त्यामुळे फार मोठे परिवर्तन शिक्षण क्षेत्रात होणार आहे. गुरू आणि शिक्षक यामध्ये फरक आहे. आजचे शिक्षण चाकोरीबद्ध दिल्या जाते, पण गुरूंनी दिलेले शिक्षण हे आपल्या जीवनाला खरे उपयुक्त ठरते. आजचे शिक्षण आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, नोकरी मिळविण्यासाठी उपयुक्त आहे. परंतू राष्ट्रसंतांनी विद्याथ्र्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे, असे सांगितले. आजचे विद्यार्थी आत्महत्या का करतात ?, हा बिकट प्रश्न समाजासमोर आहे. त्यांना खयाअर्थाने जीवन शिक्षण मिळत नाही का ?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. विद्याथ्र्यांनी नाना कला शिकल्या पाहिजेत, असे राष्ट्रसंतांनी सांगितले. कला जीवन जगतांना सदैव उपयुक्त ठरतात. चीनमध्ये विद्याथ्र्यांना कौशल्य शिक्षण कशाप्रकारे दिल्या जाते, हे त्यांनी सहउदाहरण सांगितले. नवीन पिढीने राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात करुन वास्तविक प्रश्नाकडे गांभीर्यपणे बघण्याची गरज आहे. नवीन शिक्षणपद्धती लागू करतांना या देशात एक भाषा असायला हवी, त्या भाषेतूनच सर्वांना शिक्षण द्यायला पाहिजे.
राष्ट्रसंतांच्या कार्यावर ते म्हणाले, चीन युद्धावेळी महाराजांनी सीमेवर जावून सैनिकांना उपदेशातून बळ दिले. युवकांनी स्वत:मधील आळस झटकून कामाप्रती सन्मान द्यायला हवा. राष्ट्रसंतांनी दिलेल्या विचारातून युवकांच्या जीवनात निश्चितच आमुलाग्र परिवर्तन होईल. शामरावदादा मोकदम यांनी राष्ट्रसंतांचे विचार व कार्य सर्वांपर्यंत पोहोचविले. विद्याथ्र्यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायला पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना विद्याथ्र्यांनी कौशल्य व जीवन शिक्षण आत्मसात करायला हवे. देशासमोर आज अनेक समस्यां आहेत, त्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगून राष्ट्रसंतांच्या विचारांची अंमलबजावणी झाल्यास आपला समाज आणि देश समृद्ध होईल, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषण करतांना आचार्य हरिभाऊ वेरूळकर म्हणाले, कुठलेही शिक्षण न घेतलेले कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव विद्यापीठाला दिले जाते. यावरुनच त्यांच्या कार्याची महती दिसते, ते लोकविद्यापीठ होय. शिक्षणाने माणूस सुसंस्कारित व्हायला पाहिजे. राष्ट्रसंतांनी संस्कारक्षम शिक्षणावर भर दिला आहे. नैतिकतापूर्ण व चरित्रपूर्ण शिक्षण विद्याथ्र्यांना मिळाल्यास खयाअर्थाने देश समृद्ध होईल. संस्कार शिबीराच्या माध्यमातून आजवर दोन लक्ष विद्याथ्र्यांना संस्कारक्षम बनविल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने आणि शामरावदादा मोकदम, छत्रपती शिवाजी महाराज, कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा व डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने व्याख्यानमालेला सुरुवात झाली. यावेळी पुष्पगुच्छ व रोपटं देवून पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागतपर भाषण प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे यांनी केले. याप्रसंगी श्री मधूभाऊ घारड यांनी मनोगत व्यकत व्यक्त केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, संचालन डॉ. रुपाली हिवाळे यांनी, तर आभार महाविद्यायाचे आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. सुबोध चिंचोळे यांनी मानले. व्याख्यानाला राष्ट्रसंतांचे भाविक भक्त, विद्यार्थी व शिक्षक मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवंदनाने कार्यक्रमाची सांगता झाली.