क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आयोजित रायगड जिल्हा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धा रोहा येथे आयोजित…

 सचिन पवार

कोकण विभाग प्रतिनिधी

मो: 8080092301

माणगांव :-रोहा तालुक्यातील ग्रेगोरियन इंग्लिश स्कूल रोहा आयोजित जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 11/9/2023 . रोजी आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये 19 वर्ष वयोगट मुले रायगड जिल्ह्यामधून चार टीमने सहभाग घेतला होता. त्यामध्ये अंतिम सामना अशोक दादा साबळे विद्यालय व माणगाव जुनिअर कॉलेज माणगाव वर्सेस कर्जत कॉलेज यांच्यामध्ये अंतिम सामना रंगला होता यांच्यात 6-0 गोल करून अशोक दादा साबळे विद्यालय विजयाचे मानकरी ठरले व विभाग स्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला विजयी संघाचे तसेच या संघाला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक डॉ .सुनील रावळे सर व श्री. सुरेश वाढवळ सर यांचे मौलाचे मार्गदर्शन केले.

माणगांव शिक्षण प्रसारकं संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. ॲड. राजीव साबळे साहेब तसेच संस्थेचे सचिव श्री. कृष्णाभाई गांधी व स्कूल कमिटी चेअरमन श्री. नरेंद्र शेठ गायकवाड. व सर्व सन्माननीय सदस्य यांनी अभिनंदन केले तसेच अशोक दादा साबळे विद्यालय व माणगाव जुनिअर कॉलेज माणगाव चे प्राचार्य श्री. डी. एम. जाधव सर तसेच शाळेचे पर्यवेक्षक श्री .एम .एस. सोनवणे सर. व तसेच ज्येष्ठ शिक्षक आर. एच. पाटील सर व सर्व शिक्षक वृंद व शिक्षक इतर कर्मचारी तसेच शाळा व कॉलेजचे सर्व विद्यार्थी या सर्वांतर्फे विजयी संघास हार्दिक हार्दिक अभिनंदन व विभागीय हँडबॉल स्पर्धेसाठी पुढील शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here