इरई’ धरणाची दोन दारे उघडली • गेल्या 3 दिवसाच्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ

इरई’ धरणाची दोन दारे उघडली

• गेल्या 3 दिवसाच्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ

इरई’ धरणाची दोन दारे उघडली • गेल्या 3 दिवसाच्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 13 सप्टेंबर
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणाची 2 दारे उघडण्यात आली आहेत. धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत होती. त्यामुळे धरणाची दोन दारे अर्धा मीटरने उघडावी लागली.
सीएसटीपीएसच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या गेट क्रमांक 1 आणि 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत. या धरणाची पाणीपातळी 207.250 मीटरवर आल्यानंतर दरवाजे बंद करण्यात येतील. या पातळीचा मेळ घालावा लागतो म्हणून दार उघडण्यात आले असून, जिल्ह्यात सध्या मोठा पाऊस नसल्याने नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही. तरीही जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील इरई नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here