बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन येथे युनिसेफ डिजिटल प्रोडक्टिव्हिटी कार्यक्रम संपन्न

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन येथे युनिसेफ डिजिटल प्रोडक्टिव्हिटी कार्यक्रम संपन्न

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन येथे युनिसेफ डिजिटल प्रोडक्टिव्हिटी कार्यक्रम संपन्न

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 13 सप्टेंबर
बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन, चंद्रपूर येथे युनिसेफ (UNICEF) द्वारा डिजिटल प्रोडक्टिव्हिटी (Digital Productivity) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष तथा प्रेरणास्त्रोत यशोधरादेवी बजाज यांच्या प्रतिमेचे पुजन करून उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रा. विजय कोयाळ सर यांनी प्रास्ताविकेतून डिजिटल प्रोडक्टिव्हिटी बद्दल मार्गदर्शन केले.

त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक राजरतन दुपारे व दुपारे मॅडम यांनी Unicef द्वारे डिजिटल प्रोडक्टिव्हिटी बद्दल सविस्तर माहिती देऊन MS-CIT या कोर्सच्या समकक्ष कोर्स Android Mobile वर समजावून सांगून हा कोर्स प्रत्यक्ष आपल्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून पूर्णपणे करवून घेतला. कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना Online Certificet प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला बजाज चंद्रपूर तंत्रानिकेतनचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. पि. आर. मालखेडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here