ओबीसी नेत्यांच्या मागणीला यश, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाही…

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

📱 8830857351

चंद्रपूर, 13 सप्टेंबर: ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार नाही त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अजित पवार, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व सर्व पक्षीयांचे डॉ. अशोक जीवतोडे यांनी जाहीर आभार मानले आहे. ११ सप्टेंबर रोज सोमवार ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत सर्व पक्षीय बैठक मुंबई येथे पार पडली. त्या बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांतर्फे असे ठरले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्या जाणार नाही. मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ओबीसी प्रवर्गाला धक्का लागू न देता मराठ्यांना आरक्षण दिले जावे असे मान्य केले. यासाठी त्यांचे जाहीर आभार डॉ. अशोक जीवतोडे यांनी मानले.

राज्य सरकारच्या निर्णयाचे ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी मानले आभार

मात्र या निमित्ताने बिहारच्या धरतीवर जात निहाय जनगणना करावी, विद्यार्थ्यांना वसतिगृह सुरू करावे व स्वाधार योजना सुरू करावी या व इतर मागण्या देखील सरकारने मान्य कराव्या असे मत देखील ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले.

सोबतच ११ सप्टेंबर ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मराठ्यांना ओबीसी समाजात समाविष्ट करू नये, याबाबत चर्चा केली. तसेच नागपूर येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात सहभाग घेवून मार्गदर्शन केले.

त्यानंतर मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी ओबीसी समाजाला चर्चेसाठी बोलवावे, असे पत्र देखील देण्यात आले आहे, असे डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here