राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तळागाळातील वंचितांना न्याय मिळवून देणार: नवनिर्वाचित कार्याध्यक्ष सोमनाथ घारे
मीडियावार्ता
इगतपुरी प्रतिनिधी: शेतकरी, वंचित, कष्टकरी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून शरद पवार यांच्या माध्यमातून सर्वच प्रश्न सोडवून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष सोमनाथ घारे यांनी सांगितले. तालुक्यातील पाच गटांमध्ये श्री घारे यांनी युवकांसी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महामार्ग, लष्कर हद्दी, धरणे विविध ठिकाणी जमिनी संपादित झाल्या असून देखील युवकांना कंपन्यांमध्ये रोजगार मिळत नसल्याने ते हतबल आहेत. बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी लवकरच पाठपुरावा करणार आहे. तसेच महिला भगिनींना रोजगार मिळण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन कार्याध्यक्ष सोमनाथ घारे यांनी पाच गटातील नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या
.ग्रामीण आदिवासी भागात आरोग्यसेवेचे तीन तेरा वाजले असून त्यावर प्रकाशझोत टाकून आरोग्यसेवा सुरळीत देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शासनाच्या योजनांसह जेष्ठ नागरिकांना पेन्शन, आरोग्य सुविधा, विध्यार्थ्याना बस सुविधा, शाळेसाठी संगणक, क्रीडा प्रशिक्षण, एम पी एस सी प्रशिक्षण असे विविध कार्यक्रमांचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात पाच गटांमध्ये श्री घारे यांनी जाऊन जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधला तेथील अडचणी समजून घेतल्या. आदिवासी भागातील नागरिकांनी व्यथा मांडल्या.
त्या सोडविण्यासाठी शरद पवार यांचे विचार तळागळात पोहचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द सोमनाथ घारे यांनी दिला. इगतपुरी तालुक्यात 96 ग्रामपंचायती असून काही ग्रामपंचायतीमध्ये पारदर्शक कामे दिसत नाही. त्यातील काही भ्रष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची सखोल चौकशी करण्यासाठी पुढाकार घेतला असून लवकरच जनतेसमोर आणणार आहे. मा. शरद पवार यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादी कॉंग्रेस माजी तालुकाध्यक्ष उमेश खातळे, राजु गतिर, गोटू नागरे, नामदेव शिंदे, योगेश गोवर्धने, तेजस भोर, काशिनाथ कोरडे, सागर टोचे, बाळा बोंडे, नवनाथ गायकर, अरुण केंकरे, शांताराम गभाले, रमेश मदगे, बाळा बोराडे, रोहिदास घारे, किसन घारे यांची साथ लाभत आहे.