भिवंडीत शिळी मच्छी मांसविक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाईची मागणी केली आहे*

23

*भिवंडीत शिळी मच्छी मांसविक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाईची मागणी केली आहे*

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

भिवंडी : भिवंडी शहरातील भिवंडी मनपाच्या प्र.स.क्र.५ अंतर्गत येणाऱ्या
मुख्य बाजार पेठेतील मांस मच्छीच्या मार्केटमध्ये काही विक्रेते शिळी मांस मच्छी विक्री करत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष भरत भोईर यांनी केला असून त्यांनी संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी भिवंडी महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांना लेखी निवेदन सादर केले आहे. त्यानुषंगाने संबंधित काही विक्रेते बोंबील, वाम अशा मच्छीला (कृत्रिम रंग) वापरून आर्थिक फायद्यासाठी सर्रासपणे विक्री करून ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे भोईर यांनी नमूद केले आहे. तसेच तीनबत्ती येथील चिकन विक्रेते सडलेला चिकन ३० ते ४० रुपये प्रति किलो दराने चायनिज गाडी मालकांना विकत असल्याचे म्हटले असून त्यामुळे नागरिक रोगराईने ग्रासले आहेत. तसेच विक्रेते मांस मच्छी धुण्यासाठी वापरत असलेले पाणी विक्रेते सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर फेकत असल्याने दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शिळी व निकृष्ट दर्जाची मच्छी आणि मांस विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करून मच्छी मार्केट परिसरात स्वच्छता राखण्यासाठी नियमित निरीक्षण अहवाल अधिपत्याखाली अधिकाऱ्यांमार्फत करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी. तसेच निकृष्ट दर्जाची मांस, मच्छी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कार्यवाहीचा कार्यपूर्ती अहवाल तसेच दैनंदिन अहवाल पुरवण्यात यावा अशी विनंती भरत भोईर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.