*देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे …*
🔥 *प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ हे घणाघाती पुस्तक 1926 मध्ये प्रकाशित झाले.*
*संपूर्ण भटी समाजात त्यावेळी खळबळ माजली.*
*ब्राह्मण हिंदुत्वाच्या नावाखाली देवळाच्या व धर्माच्या माध्यमातून बहुजन समाजाचे हजारों वर्षापासून शोषण करीत आहेत.*
*ब्राह्मणांचे शोषणाचे आश्रयस्थान म्हणजे ‘देऊळ’ .या देवळात धर्मशाळा खाली काय अत्याचार चालतो याची सविस्तर माहिती या पुस्तकात प्रबोधनकारांनी दिलेली आहे.या देवळाच्या शोषण व्यवस्थेत आजही बदल झाला नाही.रोज नवी शेकडो देवळे निर्माण होत आहेत व त्यासाठी त्यांच्याच गुलामीचे व दारिद्र्याचे कारस्थान रचले जात आहे.प्रबोधनकारांनी या पुस्तकात देवळाच्या उगमाचा सविस्तर सांस्कृतिक आलेख मांडला आहे.भट समाज देऊळ व धर्म कल्पनेच्या माध्यमातून त्यांची व्यवस्था जिवंत ठेवून गुलामीत जगणारा समाज निर्माण करीत आहेत.*
*प्रारंभी सर्व देवळे ब्राह्मणांच्या ताब्यात जाण्यापूर्वी बहुजनांच्या ज्ञानाची व माहितीची, संपर्काची केंद्रे होती. ब्राह्मणांनी त्यावर कब्जा मिळवून आपली घाणेरडी संस्कृती लागली.सांस्कृतिक दहशतवाद पसरविणाऱ्या ब्राह्मणांचे लपण्याचे अड्डे म्हणूनच आज देवळाचा उपयोग होतो आहे.देवळातील कुठल्याही देवाबद्दल अथवा मूर्तीबद्दल ग्रामस्थांच्या मनात किंचितही आस्था , श्रद्धा नसते. ब्राम्हणांना फक्त देवाच्या आडून स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो.*
*बहुजन समाजास प्रगती करावयाची असेल तर ही सर्व देवळे ब्राह्मणांच्या ताब्यातून सोडवावी लागतील.त्यांना देवळातून हाकलावे लागेल.आपल्या संस्कृती व देशाचा काहीही संबंध नसताना ब्राह्मण मोक्याच्या जागी बसून आपली मिजास मिरवून बहुजनांस हिन लेखतो आहे. बहुजनांतील शिकलेली माणसे अज्ञान व श्रद्धेपोटी लाखो रुपये मंदिरासाठी खर्च करीत आहेत.फुले शाहू महाराज पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा बांधण्याऐवजी देवळे बांधली असती तर बहुजन समाजाची काय अवस्था झाली असती ? त्यांना शिक्षण मिळाले असते का ? परंतु दुर्दैवाने या महापुरुषांच्या शाळातून शिकलेली पिढी नवी शाळा बांधण्याऐवजी मंदिरांची निर्मिती करीत आहे ,याला काय म्हणावे ?*
*गावागावात राहायला घरे नाहीत , घरांवर कौले नाहीत परंतु किमान पंचवीस लाखाचे मंदिर प्रत्येक गावात आहे.देशातील सर्व मंदिरे ही बहुजन समाजाने बांधली आहेत .मंदिर बांधले की भट येतो व त्या मंदिराचा ताबा घेतो. प्रबोधनकार म्हणतात देवाच्या मूर्ती साठी आणि देवळाच्या कीर्ती साठी प्राणार्पण करणारा एक तरी भट दलाल इतिहासात कोण दाखवून देईल?,मंदिरासाठी वा देवासाठी एकही ब्राह्मण मदत करीत नाही. राम मंदिराच्या आंदोलनात 67000 बहुजन युवक मारले गेले, एकही ब्राह्मण मेला नाही ! मरणार नाही.*
*🐚 15 मे 2003 रोजी गोपाळ बडवा हा ब्राह्मण पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या तीर्थकुंडात मुतला . बहुजनांतून काहीही प्रतिक्रिया आली नाही. ब्राह्मण बहुजनांच्या देवावर मुततो व त्यांचे मुत तीर्थ म्हणून आजही धर्माच्या नावावर बहुजनांस पाजतो ,या पेक्षा दुर्दैव ते कोणते असू शकते ? देशातील सर्व मंदिरे भट्ट मुक्त करण्याचे आंदोलन बहुजनांनाच उभारावे लागेल.पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील सर्व हारामखोर बडव्यांना हटविल्याशिवाय विठ्ठलाची मुक्तता होणार नाही.नाहीतर नामदेव तुकोबांच्या वारकरी चळवळीला काही अर्थ उरणार नाही. ज्ञानदेवास पुढे करून ब्राह्मण दलाल वारकरी चळवळीत घुसलेच आहेत.भटांच्या तावडीतून विठ्ठलाला प्रथम मुक्त करणे हे वारकऱ्यांचे व सर्वच बहुजनांचे पहिले कर्तव्य आहे.*
*साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले होते.त्यावेळी सेनापती बापट भाई माधवराव बागल यांच्याकडे गेले व त्यांनी साने गुरुजींच्या मंदिर मुक्त आंदोलनास भाईंचा पाठिंबा मागितला तेव्हा भाई बापट म्हणाले मंदिर दलितांसाठी मुक्त करण्या अगोदर विठ्ठल भटमुक्त करा . केवळ मंदिर खुले होऊन चालणार नाही प्रथम भटांना तिथून हाकलावे लागेल तरच सर्वांना मंदिर खुले होईल.*
*बौद्ध काळात सर्वत्र विहारं होती.बौद्ध भिक्षू तेथून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असे .समतेची शिकवण दिली जात असे. विहारात कसलाही भेदभाव नव्हता. परंतु पुष्पमित्र शुंग याच्या प्रतीक्रांतीनंतर बहुजनांवर मनूसंस्कृती लादली गेली.बौद्ध भिक्षूंच्या हत्या ब्राह्मणांनी केल्या.त्यावेळी ब्राह्मणांचे नेतृत्व शंकराचार्यांनी केले. सर्व विहारांचे मंदिरात रूपांतर केले. आजचे राम मंदिर ही पूर्वी बौद्ध विहार होते. नालंदा, तक्षशिला ही ज्ञानकेंद्रे ब्राह्मणांनी जाळली व नष्ट केली.त्यांचे देवळे केलि व त्यावर भटांनी ताबा घेतला. मंदिराच्या माध्यमातून देवांचा उगम झाला ब्राह्मणांनी त्यावर बहुजनांवर जरबेने व धार्मिक दहशत बसवली. बहुजनांचे ज्ञानाचे एकत्र येण्याची स्थाने भटांच्या ताब्यात गेली . त्यावेळी भटांनी देवळाचा ताबा घेतला तो आजपर्यंत कायम आहे. येथून ज्ञानाऐवजी भीती पसरविली जाते.*
*प्रबोधनकार म्हणतात,” देवळा शिवाय भट नाही आणि भटा शिवाय देव नाही.” असा एक सनातनी अलिखित नियमच ठरून गेला.*
*ह्यामुळे पुराण प्रसव्या भटांनी देवळांची संख्या भरमसाठ वाढविण्यासाठी देवांची संख्या वाढवत वाढवत 33 कोटी वर नेऊन भिडविली .* *त्यामुळे प्रत्येक देवाचे देऊळ, या अहमहमिकेने साऱ्या हिंदुस्तान भर देवळांचा मुसळधार वर्षाव सुरू झाला.*
*निरनिराळे देव आणि भक्त यांच्या संप्रदायांत जरी आडवा उभा विस्तव जाईना तरी सर्व देवळात भट मात्र अभेदभावाने देव-मानवाला दलाल म्हणून हजरच.* *बाप-भट जरी रामाचा पुजारी असला तरी लेक-भट रावणाच्या पूजेला तयारच !*
*🔥 मुस्लिमांनी हिंदूची देवळे फोडली, मुर्ती तोडल्या असा भट प्रचार करून भारतात हिंदू- मुस्लिम दंगली घडवत असतात.जाती-जातीत व धर्मात संघर्ष कायम ठेवून आपले स्थान टीकवत असतो.* *महंमद गझनीने सोमनाथाचे मंदिर लुटले त्याचे कारण तेथील संपत्ती होय.* *ब्राह्मणांनी दान-दक्षिणेच्या माध्यमातून आलेला अमाप पैसा मंदिरात जमा करून ठेवला होता.* *आजही तिरुपती, सत्यसाईबाबा, सिद्धिविनायक व इतर अनेक मंदिरात करोडोंची संपत्ती जमा होत असते.* *त्या काळी सर्व धनसंपत्ती मंदिरात ठेवली जायची.* *ही संपत्ती लुटण्यासाठी आक्रमकांनी मंदिरे फोडली , ब्राह्मणांच्या अड्यावरच चढाई केली.*
*प्रेषित महंमद पैगंबराच्या जन्माच्या अगोदर कौटिल्याने ‘राजाने देवळातील बहुजनांच्या संपत्तीचे अपहरण कसे करावे ‘ हे माहितीसाठी लिहून ठेवले आहे .* *काश्मीरचा राजा हर्षद याने नव्याने मंदिरे लुटण्या करिता ‘देवोत्पाटण’ खातेच काढले होते .* *देवळे लुटणे,मूर्ती फोडणे , वितळणे हा त्या खात्याचा कारभार होता.*
*स्वतःच्या स्वार्थासाठी ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंग याने ब्रहद्र्थाचा खून केला व भारतातील सर्व बुद्ध विहारे जाळून टाकली .बौद्धांच्या कत्तली केल्या . यावेळी मुसलमान धर्माचा जन्मही झाला नव्हता.*
*उत्तर पेशवाईत दुसऱ्या बाजीरावाच्या काळात इ. स. 1770-71 मध्ये पेशव्यांचे सरदार त्र्यंबक पेठे याने मेलकोटा येथील रामाणूचाऱ्याचा मठ लूटला.* *1775 मध्ये हरीपंताच्या सैन्याने 1791 मध्ये पटवर्धनाने शृंगेरीचा मठ लुटला व तेथील स्त्रियांवर बलात्कार , अत्याचार केले. हे सर्व जण ब्राह्मणच होते.*
*📚 संशोधक शिवश्री हरी नरके यांच्या मतानुसार सध्या भारतात 5 लाख 76 हजार मंदिरे आहेत.* *त्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाख एक हजार कोटी रुपये आहे.’तर भारत सरकारचे राष्ट्रीय उत्पन्न चार लाख चोपन्न हजार कोटी रुपये आहे. भारत सरकारच्या वार्षिक उत्पन्नाच्या दुपटीपेक्षा जास्त मिळकत मंदिरात आहे. महाराष्ट्र सरकारचे वार्षिक उत्पन्न 34 हजार कोटी रुपये तर महाराष्ट्रातल्या मंदिराचे वार्षिक उत्पन्न 40 हजार कोटी रुपये आहे .हा पैसा कुठे जातो ?.याचा हिशोब बहुजन समाज विचारत नाहीत. मंदिरात जमा होणारा सर्व पैसा हा बहुजन समाजाचा आहे. परंतु हा सर्व पैसा ब्राह्मणांना मिळतो , बहुजनांच्या विरोधात काम करणाऱ्या ब्राह्मणी संस्था या पैशावरच चालतात.* *आम्ही आमचाच नाश करून घेण्यासाठी मंदिराच्या माध्यमातून ब्राह्मणांना रसद पुरवित आहोत !*
*डाॅ. भाऊराव पंजाबराव देशमुख यांनी 1932 साली मध्यप्रांत वर्हाडच्या कायदे कौन्सिल समोर ‘ हिंदू देवस्थान संपत्ती बिल ‘ आणले होते.*
*समाजाचे परिवर्तन शासकीय कायद्याच्या मदतीने करण्याचा भाऊसाहेबांचा मानस होता.*
*प्रांतातील सारी हिंदु देवस्थाने शासकीय नियंत्रणाखाली आणून त्यांच्या संपत्तीचा उपयोग प्रजेच्या शिक्षण कार्यासाठी करावा असा या बिलाचा प्रमुख उद्देश होता . शिक्षण ही सामाजिक परिवर्तनासाठी शासनाची प्राथमिक गरज आहे ,शिक्षण मिळाले म्हणजे बदल होईल ,अज्ञान दूर होईल हे सभागृहात भाऊसाहेब त्यांनी पटवून दिले.विधेयक मंजूर होत होते असे दिसताच ब्राह्मणांनी हे विधेयक लोकांसमोर टाकण्याचा डाव खेळला .भारतातील सर्वसामान्य माणूस हा देव भोळा,धर्म भोळा भटांच्या पूर्ण गुलामीत गेलेला आहे याची जाणीव पंजाब रावांना होती.ज्यांच्या उद्धारासाठी हे सारे प्रयत्न करत आहोत ते त्यास विरोध करून आपणास शत्रू समजतील याची भीती पंजाब रावांना होती आणि प्रत्यक्षात असेच घडले . ब्राह्मणांचा डाव यशस्वी झाला.*
*व सर्व वृत्तपत्रे पुरोहित भट धर्मगुरू हरदास कीर्तनकार शंकराचार्यांनी भाऊ साहेबांच्या विरोधात रान उठवले. त्यांची बदनामी केली, धमक्या दिल्या.*
*पंजाबराव धर्माचा विरोध करावयास निघाले आहेत असे वातावरण तयार केले. दुर्दैवाने बहुजनांच्या उद्धाराचे हे बिल भटांच्या चिथावणी वेळी बहुजनांच्या विरोधामुळे मंजूर झाले नाही हे दुर्दैव.* *हे बिल पास झाले असते तर मंदिराचे रुपांतर ज्ञानपीठात झाले असते. भटांची बहुजनांच्या दान दक्षिणेच्या रिझर्व्ह बॅकेतून हकाल पट्टी झाली असती.*
*🇦🇽 प्राक्षिप्त :- अशा दान-दक्षिणेच्या बहुजनांच्या संपत्तीच्या बॅकेवर निरव, माल्या प्रमाणे आजच्या आधुनिक चिन, पाकिस्तान या सारख्या शेजार वैऱ्याने डल्ला मारुन वाकुल्या दाखवू नये म्हणजे झाले.*
संदर्भ :- देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे
📚प्रबोधनकार ठाकरे📚
संपादक :- गंगाधर बनबरे
जिजाई प्रकाशन क्रमांक : 7