अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ आटपाडी तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळ यांच्या मार्फत बांधकाम व नाका कामगारांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यास प्रारंभ.

47

अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ आटपाडी तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळ यांच्या मार्फत बांधकाम व नाका कामगारांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यास प्रारंभ.

ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाचा मागणीला यश.

अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ आटपाडी तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळ यांच्या मार्फत बांधकाम व नाका कामगारांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यास प्रारंभ.
अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ आटपाडी तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळ यांच्या मार्फत बांधकाम व नाका कामगारांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यास प्रारंभ.

संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
9890093862
आटपाडी:- ऍड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे अखिल महाराष्ट्र कामगार- कर्मचारी संघ यांच्या विद्यमाने सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तालुक्याच्या वतीने प्रथमता आटपाडी शहरामध्ये शुक्रवार दि.12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:30 वाजता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम व नाका कामगारांना दैंनदिन मोफत मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्याचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते अरुण (भाऊ) वाघमारे यांच्या शुभहस्ते उद्घघाटनीय फित कापून या योजनेस प्रारंभ झाला. पहिल्याचं दिवशी तब्बल 200 लोकांच्या जेवणाची मोफत सोय करण्यात आली व त्यास उस्फुर्त प्रतिसादही मिळाला. कोरोनाच्या काळामध्ये अश्याचप्रकारे लोककल्याणकारी योजना जनतेसाठी तालुक्याच्या अनेक ठिकठिकाणी राबवूत व गरजूंना सहकार्य करण्याचा विश्वास अरुण(भाऊ)वाघमारे यांनी सर्वांसमोर बोलताना व्यक्त केला.बांधकाम व नाका कामगारांनी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाचे आभार मानले.

त्यावेळी अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाचे आटपाडी तालुका अध्यक्ष आबासो काटे यांनी सर्व बांधकाम कामगार व नाका कामगारांना दररोज दुपारी व रात्री जेवण मंडळाच्या मार्फत पुरवले जाईल त्या भोजनाचा स्वाद घ्यावा असे आव्हान बांधकाम व नाका कामगारांना केले.

यावेळेस आखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाचे आटपाडी तालुकाध्यक्ष आबासो काटे, तालुका सचिव शैलेंद्र ऐवळे, वडर समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण, अरुण चव्हाण (सर), सुरज चव्हाण,भिकाजी खरात, संतोष, याच्या बरोबर अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ, आटपाडी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते. तसेच बांधकाम कामगार वडर समाजातील नाका कामगार बांधव उपस्थित होते.