हंसराज अहीर यांच्या पाठपुराव्याने अखेर धोपटाळा कोळसा खाण प्रकल्प मार्गी प्रकल्पग्रस्तांना मिळणार 175 कोटी व 1080 नौकऱ्या प्रकल्पग्रस्तांनी मानले हंसराज अहीर यांचे आभार

51

हंसराज अहीर यांच्या पाठपुराव्याने अखेर धोपटाळा कोळसा खाण प्रकल्प मार्गी

प्रकल्पग्रस्तांना मिळणार 175 कोटी व 1080 नौकऱ्या

प्रकल्पग्रस्तांनी मानले हंसराज अहीर यांचे आभार

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की : धोपटाळा कोळसा खाण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमीनीचा मोबदला, नोकरी तसेच स्थानिकांना रोजगारा संबंधी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी सातत्याने चर्चा, बैठका व पाठपुरावा केल्यामुळे धोपटाळा प्रकल्पग्रस्तांना मोबदला व नोकऱ्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधीत प्रकल्पग्रस्तांनी दि. 12 ऑक्टो. रोजी अहीर यांच्या निवासस्थानी जावून त्यांचे स्वागत केले. त्यांच्या प्रयत्नामुळे न्याय मिळाल्याने त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली व आभार मानले.
याप्रश्नी दि. 23 सप्टेंबर रोजी या प्रश्नाला घेऊन हसराज अहीर यांनी वेकोलि नागपूर मुख्यालयात बैठकीचे आयेजन करीत.धोपटाळा खाणीस विनाकारण विलंब होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावेळी महिनाभरात हा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलनात्मक भुमिका घेवू असा इशारा दिला होता. त्यानुसार हंसराज अहीर यांच्या माध्यमातून अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे. सास्ती, धोपटाळा, कोलगांव, बाबापुर, मानोली या गावातील शेतकऱ्यांची 870 हेक्टर शेतजमीन वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील धोपटाळा युजी टु ओसी या प्रकल्पाकरीता सन 2015 मध्ये सी.बी. एक्ट 1957 च्या सेक्शन 9 च्या अधिसुचनेनुसार संपादीत करण्यात आली होती. या प्रकल्पात सुमारे 175 कोटी रूपये प्रकल्पग्रस्तांना प्राप्त होणार असुन 1080 नौकऱ्या सुध्दा मिळणार आहेत. त्यामुळे मुखल्याच्या बैठकीचे आयोजन करीत धोपटाला खनिस विनाकारण विलंब होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती यावेळी महिन्याभरात हा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलत्मिक भूमिका घेऊ असा इशारा दिला होता,