शांतीदूत पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जन्मोत्सव निमित्त हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात मध्ये फळ वाटप.

✒️आशिष अंबादे✒️
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट:- पैगंबर मुहम्मद साहेब यांच्या जन्मोत्सव निमित्त संपूर्ण जगात रबीउल अव्वल उर्दू महिन्याचे दिनांक 12 तारखेला ईद मिलाद साजरा करतात.
त्यांच्या जन्मोत्सव निमित्ताने हिंगणघाट येथे मर्कझी सिरतूनबी कमिटी द्वारे 12 दिवस विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जाते, लहान मुलांसाठी स्पर्धा आयोजित करतात, रुग्णांना फळ वाटप, गोर गरिबांची मदद असे अनेक कार्यक्रम राबविण्यात येते. पैगंबर मुहम्मद साहेबनि दिलेल्या संदेश संपूर्ण जगासाठी असून प्रत्येक व्यक्तीनां समान अधिकार दिलेले आहे.
रुग्णालयात जाऊन रुग्णांना विचारपूस करणे, त्यांची सेवा करने त्यांना फळ, बिस्किट वाटप करणे असे अनेक सामाजिक कार्य मर्कजी सिरतूनबी कमिटी दरवर्षी करतात. या कार्यक्रमाला प्रामुख्याने फारुख साबरी, हमीद रजा (भाईजी हिंगणघाटी), अझहर हुसेन, नदीम साबरी, शबाना बाजी, अब्दुल कदिर बख्श, सादिक मलनस उपस्थित होते.