10 हजाराची लाच” पडली महागात, महिला दुय्यम निबंधकास लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक • चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

56
10 हजाराची लाच" पडली महागात, महिला दुय्यम निबंधकास लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक • चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

“10 हजाराची लाच” पडली महागात, महिला दुय्यम निबंधकास लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक

• चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

10 हजाराची लाच" पडली महागात, महिला दुय्यम निबंधकास लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक • चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

मूल : 13 ऑक्टोबर
दस्त नोंदणीचे काम करून देण्याकरिता 10 हजाराची लाच स्विकारताना मूल येथील महिला दुय्यम निबंधक वैशाली मिटकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास येथील दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली.
तालुक्यातील मारोडा येथे राहणारे तक्रारदार हे स्वत: दस्तलेखनाचे काम करतात. त्यांना पक्षकाराची शेती जमीन फेरफार करायची होती. त्यांनी दस्त तपासणी व शेत जमीनीचे मूल्यांकन काढले व पुढील कामाकरिता मूल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दुय्यम निबंधक श्रेणी-1 अधिकारी वैशाली मिटकरी यांना दस्ताची मुद्रांक व नोंदणी शुल्काबाबत विचारणा केली. या कामासाठी शुल्क व्यतिरिक्त 15 हजार रुपयांची मागणी मिटकरी यांनी तक्रारदारांकडे केली. परंतु तक्रारदारांना मिटकरी यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना भेटून तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळी करून गुरुवारला सायंकाळी लाचलुचपत विभागाने मूल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा रचला. यामध्ये वैशाली मिटकरी यांना शेतीचे दस्त नोंदणी करण्याच्या कामाकरिता तडजोडीअंती 10 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे, चंद्रपूर विभागाच्या पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील, पोलिस कर्मचारी हिवराज नेवारे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, पुष्पा काचोळे, शामराव बिडगर यांनी केली.