अहेरी खोटारड्या जुमलाबाज सरकारचा होवु द्या चर्चा कार्यक्रमा अंतर्गत भंडाफोड
मारोती काबंऴे
मीडिया वार्ता न्यूज
गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मों नं.9405720593
अहेरी बेईमान सरकारला येत्या निवडणुकीमध्ये स्मशानात दफन करा.= *विलास कोडापे*
मा.शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आदेशान्वये महाराष्ट्रात सुरु असलेल्या *होऊ द्या चर्चा* कार्यक्रमाअंतर्गत आणि
मा.हिन्दु ह्वदय सम्राट वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे गाव तिथे शाखा व घर तिथे सैनिक या धोरणा नुसार मा.विनायक राऊत साहेब सचिव,मा.प्रकाश वाघ साहेब पुर्व विदर्भ समन्वयक मा.महेश केदारी साहेब जिल्हा संपर्क प्रमुख,मा.शिवाजीराव खोडदे पाटील विधानसभा संपर्कप्रमुख यांचे मार्गदर्शनात लहान लहान गावखेड्यात व शहरातील वार्डात जनते पर्यंत पोहचुन मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांचे नेतृत्वातील महाविकास आघाडी चे सरकार ची लोकाभिमुख कामे व घटनाबाह्य,धोखेबाज मिंदे सरकार चे काळात होत असलेल्या महाराष्ट्राचा वाटोळे करनार्या योजनांचा भंडाफोळ करण्यात येत आहे.
याचाच भाग म्हणुन अहेरी येथील वार्ड क्र.५ बेघर वस्ती येथील लोकामध्ये जावुन चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी राज्यात २०१९ मध्ये मा.उद्धवजी ठाकरे साहेबांचे नेतृत्वात सत्तेत आलेली महाविकास आघाडी ची लोकाभिमुख कामे जसे *शिव भोजन,शेतकर्यांना कर्ज माफी,गडचिरोली जिल्ह्याचे विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देणे,कोरोना काळात केलेले उल्लेखनीय काम,बेघर लोकांना घरकुल* वै.बाबत चर्चा करण्यात आली.तसेच
केंद्र सरकारची फसवी गँस योजना *उज्वला मधील गँस ची गगनाला भिडलेली,सामान्याच्या आवाक्याच्या बाहेर झालेली भाव वाढ,त्यावरील सबसिडी जी आता पुर्ण बंद केलेली आहे,घरकुलाची निधी थांबवने,शाळाचे खाजगीकरण,आरोग्य विभागात ही नोकर भरती खाजगी कंपनीचे माध्यमातुन करणे,पोलीस भरतीसुद्धा कंत्राटी पद्धतीने करणे ,डिझेल – पेट्रोल चे वाढलेले भाव,प्रत्येकाचे खात्यात १५ लाख रुपये टाकन्याचा जुमला* वै.अनेक फसव्या घोषणाचा भंडाफोड करण्यात आला.
*यावेळेस उपस्थित बेघर वस्तीतील लोकानी त्यानी घरकुलासाठी अर्ज केलेले आहेत पण त्यापैकी कुणालाही घरकुल मंजुर झाले नसल्याची व्यथा सांगीतली* मा.उद्धव ठाकरे साहेबांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ व त्यांची जनतेसोबत असलेली बांधीलकी तसेच बोललेला शब्द पाडण्याचा स्वभाव बघुन आम्ही निश्चितच येत्या निवडणुकीमध्ये शिवसेना ( उ.बा.ठा.) लाच मतदान करणार अशी ग्वाही दिली.
यावेळेस शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख विलास कोडापे,उप जिल्हाप्रमुख अरुण धुर्वे,युवासेना जिल्हाधिकारी दिलीप सुरपाम यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास राकेश मुन्नमवार युवासेना उप जिल्हाधिकारी,अक्षय गहेरवार युवासेना समन्वयक,राजु मामीडवार मा.उप तालुका प्रमुख इ.पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळेस उपस्थितांनी आमचे बेघर वस्तीत कुणीही राजकीय पुढारी येत नाहीत पण आपण आलात व आमच्याशी चर्चा/हितगुज केले ह्याबद्दल आनंद झाल्याचे मत व्यक्त केले.